जयंत धुळप, अलिबागरायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पळचिल गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तब्बल ४६ लाख १ हजार १६७ रुपये खर्चून खोदण्यात आलेल्या विहिरीस पाणीच लागले नसल्याने, ग्रामस्थांची तहानही भागली नाही आणि पैसेही फुकट गेले अशी भावना ग्रामस्थांची झाली आहे. पळचिल गावचे ग्रामस्थ तथा पळचिल ग्रामस्थ मुंबई मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ मारुती जाधव यांना माहितीच्या अधिकारात ही माहिती प्राप्त झाली आहे.तीव्र उन्हाळ््यामुळे सध्या पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी या ग्रामस्थांवर आली आहे. पावसाचे आगमन एका आठवड्याने जरी लांबले तर पळचिल ग्रामस्थांवर स्थलांतर करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. १९८८-८९ मध्ये रायगड जिल्हा परिषदेमार्फत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात आले होते परंतु ती योजना गावातील लोकांसाठी अपुरी ठरली. गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधून तयार असून देखील पाण्याअभावी नवीन इमारतीतील आरोग्य केंद्र सुरु करता आलेले नाही, अशी गंभीर परिस्थिती पाण्याअभावी निर्माण झाली असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.ग्रामस्थांच्या मागणीनुसार रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत भूजल सर्वेक्षण विभागाकडून नवीन पाणी योजना प्रस्तावित करण्यात आली. प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार विहीर बांधणे, उर्ध्व वाहिनी टाकणे, साठवण टाकी बांधणे व गावात गुरुत्व वाहिनी टाकणे आदी बाबींसाठीच्या पाणी पुरवठा योजनेकरिता ४६ लाख १ हजार १६७ रुपये मंजूर करण्यात आले अशी माहिती, माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना पळचिल गावचे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ माारुती जाधव यांना रायगड जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अलिबाग या कार्यालयाकडून लेखी देण्यात आली आहे. या विहिरीचे बांधकाम गतवर्षी मे २0१५ मध्ये पूर्ण झाले असून विहिरीमध्ये मात्र थेंबभरही पाणी सापडलेले नाही. परिणामी शासनाने ४६ लाख १ हजार १६७ रुपये खर्च करुन आणि भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण करुन सुद्धा विहिरीत पाण्याचा थेंबही नसल्याने गावातील सर्व ग्रामस्थ संतप्त व अस्वस्थ झाले आहे. कोणत्याही क्षणी पाण्यासाठी ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे जाधव यांनी सांगितले. संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी बेजबाबदार व चुकीच्या पद्धतीने काम करुन संपूर्ण ग्रामस्थांची आणि शासनाची फसवणूक केली आहे, असा आरोप पळचिलमधील जनता करीत आहे. या पाणी योजनेची पूर्णपणे चौकशी करुन ग्रामस्थांना पाणी देण्याची व्यवस्था करावी नाही तर पाण्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल असे ग्रामस्थांच्या वतीने जाधव यांनी सांगितले.४६ लाख १ हजार १६७ रुपये खर्च करुन आणि भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण करुन सुद्धा विहिरीत पाण्याचा थेंबही नसल्याने गावातील सर्व ग्रामस्थ संतप्त व अस्वस्थ झाले आहे. कोणत्याही क्षणी पाण्यासाठी ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ मारुती जाधव यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने काम झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.> पळचिलमधील या विहिरीच्या खोदाईकरिता भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या सर्वेक्षण अहवालानुसारच विहिरीची त्याच ठिकाणी खोदई करण्यात आली आहे. पोलादपूर तालुक्यांतील नैसर्गिक भूजल पातळी मुळातच खाली गेली आहे. त्यातच या तालुक्यांतील या पळचिल गावासह अनेक गावे ही डोंगरावर असल्याने तेथे भूजल स्रोत सत्वर उपलब्ध होण्यात अनेकदा अडचणी येतात.भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अहवालानुसार पळचिल गावांतील या विहिरीकरिता १०.५ मीटरची खोदाई के ली परंतु पाणी लागले नसल्याने १३ मीटरपर्यंत करण्यात आली. तरीही पाणी लागलेले नाही.विहिरीला कायमस्वरुपी पाणी राहाण्याकरिता जलशिवार योजनेतून बंधारा बांधणे प्रस्तावित असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा महाडचे शाखा अभियंता शैलेश बुटाला यांनी सांगितले.
भूजल पातळी खालावली
By admin | Updated: June 3, 2016 01:59 IST