शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला केंद्राचा हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 04:37 IST

सिडको उभारणार प्रकल्प : दोनशे कोटींचा खर्च अपेक्षित

पनवेल : खारघर ते सीबीडीदरम्यान खाडीकिनारी सुमारे दोनशे कोटी रु पये खर्च करून सिडकोकडून कोस्टल रोड उभारण्यात येणार आहे. नुकतीच केंद्रीय पर्यावरण विभागाने या रस्त्याला मंजुरी दिली आहे. लवकरच सिडको याकरिता निविदा मागविणार आहे.

खारघर शहर निर्माण करताना सिडकोने खारघर, तळोजा वसाहतीमधील नागरिकांना मुंबई परिसरात विनाअडथळा जाता यावे, यासाठी खारघर सेक्टर ४३ ते स्पॅगेटी वसाहतीपर्यंत चार पदरी रस्ता उभारला आहे. सिडकोने स्पॅगेटी वसाहत, सेक्टर १0, खारघर स्थानक आणि सेक्टर ११ खाडीकिनाऱ्यावरून नवी मुंबईत पामबीच जाता यावे, यासाठी सिडकोने कोस्टल रोडचे नियोजन केले होते. मात्र, खाडीलगत असलेल्या कांदळवनांची कत्तल करावी लागत असल्याने केंद्रीय पर्यावरण विभागाने यावर बंदी घातली होती. आता पन्नास मीटरपर्यंत कामे करता येणार असल्याची परवानगी दिल्यामुळे सिडकोने कोस्टल रोडचा प्रकल्प हाती घेतला आहे. स्पॅगेटी ते खारघर स्थानकापर्यंत रस्ते उभारणीला पर्यावरण विभागाने परवानगी दिली आहे. तसेच खारघर ते सीबीडी खाडीकिनारा दरम्यानच्या रस्त्याला लवकरच परवानगी मिळणार असल्यामुळे सिडकोकडून रस्त्यासाठी जवळपास दोनशे कोटी रु पये खर्च करण्याचे नियोजन आहे.पुढील वर्षी मार्चअखेरीस रस्त्यासाठी निविदा काढण्यात येणार आहेतसायन-पनवेल महामार्गावरील स्पॅगेटी आणि खारघर टोल नाका दरम्यान पूल उभारताना कोस्टल मार्गे सीबीडीवरून पनवेलच्या दिशेने जाता यावे यासाठीही रस्ता केला जाणार आहे.खारघर ते सीबीडी दरम्यान कोस्टल रोड झाल्यास सायन-पनवेल महामार्गावर खारघर टोलनाका ते सीबीडी, नेरु ळ, सानपाडा दरम्यान होणारी वाहतूककोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. तळोजा-खारघरमधील नागरिकांना नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी रस्त्याचा उपयोग होणार आहे.खारघर-सीबीडी दरम्यान उभारल्या जाणाºया कोस्टल रोडला केंद्रीय मंत्रालयाच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे.हा प्रकल्प सिडकोकडून उभारला जाणार असून, पुढील वर्षी या रस्त्याच्या उभारणीसाठी निविदा काढण्याचा सिडकोचा विचार आहे.- सीताराम रोकडे, प्रशासक, खारघर सिडको 

टॅग्स :Raigadरायगडroad transportरस्ते वाहतूक