शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुशेत नदीवरील नव्या पुलाला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 04:32 IST

एक कोटी २२ लाखांचा निधी मंजूर; ७० वर्षे जुना पूल मोडकळीस आल्याने नवीन प्रस्ताव

अलिबाग : तालुक्यातील मुशेत नदीवर नव्याने पूल बांधण्याला सरकारने हिरवा कंदील दिला आहे. पुलासाठी तब्बल एक कोटी २२ लाख ५० हजार रुपये मंजूरही केले आहेत. ७० वर्षे जुन्या पुलाच्या जागी आता लवकरच नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पुलावरून प्रवास करताना आता जीव मुठीत घेऊन जावे लागणार नाही.मुशेत पूल पूर्णपणे मोडकळीस आला असल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे, तसेच या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हा पूल नादुरुस्त असल्याने या पुलावरून अलिबाग, रेवस तसेच बेलवली, बहिरोळे, मापगाव, कनकेश्वर देवस्थान, मुशेत आणि कार्लेखिंडीकडे जाणारी वाहने जीव मुठीत धरून प्रवास करतात. ग्रामीण भागाची नाळ अलिबाग शहराला जोडण्याचे महत्त्वाचे काम या पुलाचे आहे. मात्र, पुलाची दयनीय अवस्था झाल्याने तेथे नव्याने पुलाची उभारणी करणे आवश्यक झाले होते. याबाबत काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी सरकारकडे मागणी केली होती. त्यांनी त्याबाबतचे पत्र १६ आॅगस्ट २०१८ रोजी दिले होते. अलिबाग शहराकडे येणाऱ्या ग्रामीण जनतेसाठी हा महत्त्वाचा पूल आहे. त्यामुळे या पुलाची नव्याने निर्मिती व्हावी, यासाठी २००५ सालापासून प्रयत्न सुरू होते, अशी माहिती माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी दिली.नागरिक सातत्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. एखादा अपघात झाल्यास त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. ही गंभीर बाब सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने १२ सप्टेंबर २०१८ च्या निर्णयाने या पुलासाठी एक कोटी २२ लाख ५० हजार रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली. लवकरच त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेमुळेही जिल्ह्यातील सर्व पुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर सरकारने सर्वच जुन्या पुलांचे स्ट्रक्टरल आॅडिट करण्याचे आदेश दिले होते.या पुलाचे काम ७० वर्षांपूर्वी झाले आहे. २०१३ च्या मुसळधार पावसामध्ये या पुलाचे एका बाजूकडील दगडी बांधकाम असलेला काही भाग कोसळला होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वीही काही ठिकाणचा भाग कमी-अधिक प्रमाणात ढासळतच होता. या धोकादायक झालेल्या पुलामुळे एक वाहनचालक वाहून गेले होते; परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. सर्व गंभीर परिस्थिती पाहता रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुशेत नदीवरील पूल पूर्णपणे नादुरुस्त झाला असल्याने नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी विनंती ठाकूर यांनी सरकारकडे पुन्हा केली होती.

टॅग्स :Raigadरायगड