शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

खाडीपट्ट्यात बहरली वाल, पावट्याच्या शेंगांची शेती

By admin | Updated: January 23, 2017 05:44 IST

पश्चिम महाराष्ट्रात हुरडा पार्टी प्रसिध्द आहे त्याचप्रमाणे कोकणात पोपटीला महत्व आहे. तूर, मुग, पावटा तयार झाला की मुंबईसह

दासगाव : पश्चिम महाराष्ट्रात हुरडा पार्टी प्रसिध्द आहे त्याचप्रमाणे कोकणात पोपटीला महत्व आहे. तूर, मुग, पावटा तयार झाला की मुंबईसह महाराष्ट्रातील खवय्ये कोकणात पोपटीसाठी येतात. पोपटीची ही चर्चा व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक सह सर्व प्रसिध्दी माध्यमांवर जोरात केली जाते. पोपटीची खरी चव कोकणात तयार झालेल्या गावठी शेंगांसोबत मिळते. महाड तालुक्यातील कडधान्याचे आगार समजल्या जाणाऱ्या खाडी पट्ट्यात मूग, वाल आणि पावट्याच्या शेंगा तयार होत असून पोपटीची पार्टी कधी सुरु होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यासाठी बेत आखले जात आहेत.महाड तालुक्यातील सावित्री नदी आणि खाडी किनाऱ्यांचा खाडी पट्टा हे कडधान्याचे आगार आहे. या भागात तुर, मूग, पावटा वाल आदी कडधान्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. खार वातावरण आणि चांगले पडलेले धुके यामुळे शेतीला मिळणार ओलावा कडधान्यासाठी पोषख आहे. यामुळे येथील कडधान्याची चव काही औरच आहे. आजकाल पोपटी चिकण आणि अंडीसहप्रसिध्द आहे. तरी पावटा, वाल, आणि तुरीच्या शेंगा मिळून लावलेली पोपटी हीच पोपटी मूळ आहे. गेली दोन महिन्यापासून पोपटीची पार्टी कशी करावयाची याची चर्चा सुरु आहे. मात्र या पोपटीसाठी पश्चीम महाराष्ट्रातून येणारा वाल पावटा सध्या वापरला जात आहे. महाड तालुक्यातील गावठी तूर, मूग पावटा आता बाजारात येण्यासाठी तयार झाला असल्याने याच्या वेगळया चर्चा सुरु झाल्या आहेत.भांबरुटीमुळे पोपटीला वेगळी चव येते. शेताच्या बांधावर भांबरुट नावाची एक वनस्पती उगवते या वनस्पत्ीला ओव्याचा वास येतो. गोल आणि गादीदार मखमली काट्याने भरलेले पान आणि पिवळया रंगाची फुले अशी ही वनस्पती कोकणातील शेताच्या बांधावर नैसर्गीकरित्या उगवते. औषधी गुणधर्म असणारी ही वनस्पती सकाळी पडणाऱ्या धुक्याच्या ओलाव्यातील पाणी शोशुन जगते. कोकणातील पोपटीमध्ये इतर पदार्थांन ऐवजी भाबरुंटीच्या पानाला अधिक महत्व दिले जाते. पावट्याचा खमंग सुगंध आणि भांबरुटीचा ओव्यासारख्या स्वाद कोकणातील पोपटीची लज्जत वाढवते. (वार्ताहर)