शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात, सहा ते सात महिने पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 03:08 IST

संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींत काम करणारे आणि डिजिटल महाराष्ट्र घडविण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे सुमारे २२ हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत.

म्हसळा -  संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींत काम करणारे आणि डिजिटल महाराष्ट्र घडविण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे सुमारे २२ हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत. २०१६ पासून याच संगणक परिचालकांची ‘आपले सरकार सेवा’ केंद्रांतर्गत नव्याने नियुक्ती करून, त्यांना केंद्रचालक हे पद देऊन आॅनलाइन कामे करून घेतली जात आहेत. मात्र, दोन वर्षांपासून परिचालकांवर अन्याय होत आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संगणक परिचालकांना मानधन मिळाले नसल्याने त्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.एकीकडे, ‘आपले सरकार सेवा’च्या नावाखाली वेगवेगळ्या मार्गाने पैसे उकळण्यात येत असल्याने केंद्र शासनाची सीएससी-एसपीव्ही ही कंपनीच ग्रामपंचायतींच्या पैशांवर डल्ला मारतेय, अशीही परिस्थिती निर्माण झाली आहे.शासनाने सर्व संगणक परिचालकांचे पद निश्चित करून, माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळाकडून नियुक्ती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेकडून करण्यात येत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवून शासनाने संगणक परिचालकांना न्याय द्यावा, अशी विनंती राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे. संगणक परिचालकांना (केंद्र चालकांना) एकूण रकमेपैकी मानधन म्हणून फक्त ६०००/- प्रतिमाह देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ते देण्यात न आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.वेळेत मानधन न होण्याची काही कारणे आहेत, त्यापैकी हजेरी न लावणे, इन्व्हाइस क्लेम न करणे, अशी काही कारणे आहेत. आता पेमेंट सिस्टीममध्ये बदल करण्यात आला आहे. नुकतेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखाधिकारी यांच्या सहीने सीएससी कंपनीच्या खात्यात एक कोटी २० लाख रु पये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी सर्व संगणक परिचालकांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा होईल.- जयेश म्हात्रे, जिल्हा व्यवस्थापक, रायगड, आपले सरकार सेवा केंद्रआपले सरकार सेवा केंद्राच्या नावाखाली सरकार आणि कंपनी अक्षरश: जनतेची फसवणूक करीत आहेत. तर आॅनलाइनची कामे करणारे संगणक परिचालक उपाशी असल्याची परिस्थिती आहे. १४ वा वित्त आयोग निधीतून ‘आपले सरकार सेवा’च्या नावाखाली ग्रामपंचायतीकडून आगाऊ रक्कम घेतली जात आहे, मग या परिचालकांना वेळेत मानधन का मिळत नाही, हा प्रश्न आहे.- किशोर काजारे, सरपंच,वळके, ता. मुरु डग्रामपंचायतींचा भरमसाठ पैसा खर्च केला जात आहे आणि त्या बदल्यात कंपनीने ज्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत गावातील नागरिकांना दिल्या पाहिजेत, त्या सेवा प्रकल्प सुरू होऊन दोन वर्षे होत आली तरी योग्य पद्धतीने सुरू झालेल्या नाहीत, याचा अर्थ शासनाच्या ‘आपले सरकार सेवा’ केंद्र या प्रकल्पाचा बोजवारा उडाला आहे.- मयूर कांबळे,राज्य सचिव तथा जिल्हाध्यक्ष

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत