शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरे नियमित करण्याच्या शासनाच्या आदेशाला केराची टोपली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2023 19:54 IST

सिडकोच्या भूखंडावर प्रकल्पग्रस्तांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकाम(घरे) नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने २५ फेब्रुवारी २०२२ घेतला आहे.

मधुकर ठाकूर 

उरणसिडकोच्या भूखंडावर प्रकल्पग्रस्तांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकाम(घरे) नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने २५ फेब्रुवारी २०२२ घेतला आहे. मात्र तरीही सिडकोच्या भूमी आणि भूमापन आणि गरजेपोटी बांधकाम विभागात या संदर्भात समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के भूखंडाच्या मंजूर पात्रतेतून ही बांधकामे कमी करण्यासाठी बांधकाम अहवाल तयार केले जात आहेत. यामुळे शासनाने प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित करण्याच्या शासन आदेशाला सिडकोकडून केराची टोपली दाखविली जात असल्याने सिडको प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

राज्य सरकारने सिडको हद्दीतील ९५ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या अकरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उरणच्या द्रोणागिरी नोडमधील शेतकऱ्यांना भूखंड वाटप प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या घरी जाऊन सिडको माहिती घेत आहे. मात्र सिडको प्रकल्पग्रस्तांच्या वारसांच्या साडेबारा टक्के भूखंडाच्या पात्रतेतून गावठाण हद्द, २५० मीटरच्या परिघासह साडेबाराच्या रेखांकनांतील घरांचे बांधकाम अहवाल सिडकोच्या सर्व्हेक्षण विभागाकडून तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे मूळ वारस शासनाच्या अनधिकृत बांधकाम नियमित करण्याच्या निर्णया संदर्भात संभ्रमात आहेत. तर शासनाने प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या वारसांची बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेऊन २० महिने उलटूनही कोणत्याही प्रकारची प्रक्रिया सिडकोच्या नव्याने निर्माण केलेल्या गरजेपोटी विभागाकडून करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. गावठाण हद्दीतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित करण्याच्या सिडकोच्या या योजनेमुळे  अनेक वर्षांपासूनची  प्रलंबित मागणी पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी शासनाच्या या योजनेचे स्वागत करून काही दुरुस्त्या सुचविल्या आहेत.

  या योजनेंतर्गत १९७० च्या गावठाण हद्दीपासून २५० मीटर अंतराच्या आत असणार्‍या व नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या निवासी बांधकामांना जमीन भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहेत. त्यासोबतच गावठाणापासून २५० मीटर अंतराबाहेरील सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्के योजनेच्या रेखांकनामधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधकाम व वास्तव्य केलेले निवासी बांधकाम भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. असे असताना उरणच्या बोकडवीरा गावातील एका सामूहिक मालकीच्या साडेबारा टक्केच्या भूखंडाच्या मंजुरी देण्यात आलेल्या पात्रतेतून गावातील मूळ गावठाण,गावठाणापासून २५० मीटर अंतरावरील व साडेबारा टक्केच्या रेखांकनातील मूळ मालकांच्या वारसांच्या नावे असलेल्या घरांच्या बांधकामाच्या मोजणी आणि माहितीसाठी सिडकोच्या सर्वेक्षण विभागातील कर्मचारी फिरताना दिसत आहेत. 

टॅग्स :Raigadरायगडcidcoसिडको