शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

महाडमध्ये शासकीय कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 05:11 IST

अनेक पदे रिक्त : नागरिकांना कामासाठी माराव्या लागतात प्रशासकीय कार्यालयात फे ऱ्या

सिकंदर अनवारे दासगाव : एकीकडे शासन जनतेच्या कामांसाठी किती गतिमान आहे हे शासकीय जाहिरातीमधून दाखवण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे मात्र शासकीय कार्यालयातील रिक्त पदांमुळे जनतेची कामे खोळंबली जात आहेत. महाड तालुक्यात हे प्रमाण अधिक असल्याने शासकीय कामे पूर्ण होण्यात अडचण येत आहे. याकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील विविध प्रशासकीय कार्यालयात कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत. तालुक्याच्या महत्त्वाच्या असलेल्या महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरवठा विभाग, पोलीस यंत्रणा आदी कार्यालयातून कर्मचाºयांची टंचाई जाणवत आहे. यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचाºयांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. कार्यालयात विविध दाखले, रेशन कार्ड, आरोग्य सुविधांसाठी येणाºया ग्रामस्थांना कार्यालयाच्या वारंवार फेºया माराव्या लागत आहेत.

महाड शहरासह तालुक्यांमध्ये रास्त धान्य वितरणाची व्यवस्था पुरवठा शाखेकडून केली जाते. गेल्या चार वर्षांपासून पुरवठा अधिकाºयांचे पद रिक्त ठेवण्यात आले असून नायब तहसीलदारांकडे या शाखेचा पदभार देण्यात आला आहे. याशिवाय निवडणूक आणि प्रांत कार्यालयाचा पदभार देखील त्यांच्याकडे देण्यात आला असल्याने पूर्णवेळ अधिकारी या शाखेला गेल्या चार वर्षांपासून नसल्याने अनेक कामे होत नसल्याची तक्र ार वारंवार करूनही जिल्हाधिकाºयांकडून कार्यवाही करण्यात आली नाही. या शाखेत नागरिकांना धान्य,रॉकेल याचे वितरण केले जाते. तालुक्यामध्ये अंत्योदय योजनेंतर्गत ४ हजार ८७२ लाभार्थी असून केशरी कार्डधारक लाभार्थ्यांची संख्या १८ हजार ८७८ आहे. यामध्ये अपात्र लाभार्थींची संख्या २२ हजार ६३२ आहे. शुभ्र रेशन कार्डधारक ४३ हजार ८७० असून या सर्वांना धान्य आणि रॉकेल नियमाप्रमाणे पुरविण्यात येत असल्याची माहिती पुरवठा शाखेकडून देण्यात आली. या शाखेमध्ये नागरिकांना नवीन रेशनकार्ड तयार करून देणे, रेशन कार्डवर नावे दाखल करणे, नावे कमी करणे इत्यादी महत्त्वाची कामे केली जातात. महसूल विभागांतर्गत असलेल्या पुरवठा विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वाची पदे रिक्त असल्याने तालुक्यांतील धान्य वितरण व्यवस्थेमध्ये सावळागोंधळ निर्माण झाला आहे. पुरवठा विभागांतर्गत कामे महिनोमहिने केली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. पुरवठा विभागांतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी अशी मागणी सामाजिक कायकर्ते सिद्धेश पाटेकर यांनी के ली आहे.महाड नगरपालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार महाड नगरपालिकेत राज्य संवर्गाच्या सहा जागा रिक्त आहेत. तर नगरपालिका आस्थापनेच्या ५ जागा रिक्त आहेत. यामध्ये जवळपास ५ क्लर्कच्या जागा रिक्त आहेत. फायरमनसारख्या पदांचा देखील यात समावेश आहे. एवढ्या मोठ्या शहराला विद्युत अभियंता देखील नाही. कर निरीक्षक, नगररचना अभियंता, सहायक मिळकत परीवेक्षक, विधि व कायदा परीवेक्षक, सहायक खरेदी भंडार परीवेक्षक ही पदे रिक्तच आहेत.२२ ग्रामसेवकांच्या जागा रिक्तच्महाड तालुक्यातील एका ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा कारभार आहे. महाडमध्ये एकूण ८४ ग्रामसेवक पदे मंजूर आहेत मात्र यापैकी २२ ग्रामसेवकांच्या जागा रिक्त आहेत. हीच अवस्था महाड महसूल विभागाच्या तलाठी कार्यालयाची असून याठिकाणी ३७ पैकी ७ तलाठी पदे रिक्त आहेत. महाडमध्ये जमीन खरेदी- विक्र ी जोमात आहे याशिवाय रस्त्यांचे विविध प्रकल्प सुरू आहेत, याकरिता जमीन मोजणीला विशेष महत्त्व आले आहे. मात्र हा विभाग सांभाळणाºया भूमी अभिलेख कार्यालयाची देखील अवस्था बिकट आहे. याठिकाणी भूकरमापक दोन्ही पदे रिक्त असून कनिष्ठ लिपिक, दुरुस्त लिपिक, प्रति लिपिक, नभू लिपिक,शिपाई अशी आठ पदे रिक्त आहेत.महाडमध्ये डॉक्टरांची कमतरताच्महाड तालुका हा ग्रामीण भागात वसलेला तालुका आहे. असे असले तरी ग्रामीण भागात आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधेशी निगडित कर्मचाºयांची देखील कमतरता आहे. महाडमध्ये असलेल्या ट्रॉमा केअरमध्ये देखील हीच अवस्था आहे. याठिकाणी आज देखील अनेक डॉक्टर पदे आणि इतर पदांची गरज आहे. 

टॅग्स :Raigadरायगड