शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सरकार शंभर टक्के पाठिंबा देईल

By admin | Updated: October 28, 2015 00:58 IST

पेण अर्बन घोटाळ्यातील महाभागाची शंभरी भरण्यास थोडा अवधी आहे. मात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवी हक्काने मिळतील. यासाठी केंद्र व राज्यस्तरावर प्रयत्न सुरू असून

पेण : पेण अर्बन घोटाळ्यातील महाभागाची शंभरी भरण्यास थोडा अवधी आहे. मात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवी हक्काने मिळतील. यासाठी केंद्र व राज्यस्तरावर प्रयत्न सुरू असून पेण अर्बनच्या लढ्याची ऐतिहासिक नोंद होईल. प्रामाणिक कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार ११० टक्के खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पेण अर्बन ठेवीदार समितीच्या सभेप्रसंगी केला.पेण अर्बन ठेवीदार संघर्ष समितीच्या लढ्यास पाच वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना आमंत्रित केले होते. राज्यमंत्रीपदाचा दर्जा प्राप्त झालेले चरेगावकर कोणतीही निवडणूक न लढता लाल दिव्याचे धनी ठरले. याचा संदर्भ देत त्यांनी आपले भाषण केले. प्रामाणिक प्रयत्नांना ईश्वर, निसर्ग व सेवाभावी कार्य करणारी माणसे न्याय देतात. पेण अर्बन संघर्षाचा लढा असाच प्रामाणिक आहे. ठेवीदारांच्या हक्काचे पै पै साठी न्यायालय, सरकार त्याचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावले आहे. त्यांची पाच वर्षांची संघर्षाची निष्ठा, अथक प्रयास यात आत्मीयता व प्रामाणिकपणा आहे. या गोष्टी ईश्वरी संकेतानुसार न्यायप्रिय असून तुमची पै अन् पै मिळणार सरकार पूर्णपणे गांभीर्याने या प्रश्नाकडे बघत असून लवकरच तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार अशी चरेगावकर यांनी खात्री दिली. पेण अर्बन संघर्ष समितीच्या पाच वर्षांच्या लढ्याची रस्त्यावरची व न्यायालयीन लढ्याचे सिंहावलोकन कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी केले.व्यासपीठावर सचिव हिमांशू कोठारी, विनीत देव व उपस्थितांमध्ये ठेवीदार बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. (वार्ताहर)