शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय खरेदीत पारदर्शकता आणणार

By admin | Updated: July 7, 2015 23:34 IST

राज्यपालांनी २०१४ च्या नोव्हेंबर महिन्यात विधिमंडळाच्या अधिवेशनातील अभिभाषणात दिलेल्या आश्वासनानुसार, सरकारने २०१५ मध्ये मांडलेल्या श्वेतपत्रिकेनुसार शासकीय खरेदीत कार्यक्षमता व पारदर्शकता

नारायण जाधव  ठाणेराज्यपालांनी २०१४ च्या नोव्हेंबर महिन्यात विधिमंडळाच्या अधिवेशनातील अभिभाषणात दिलेल्या आश्वासनानुसार, सरकारने २०१५ मध्ये मांडलेल्या श्वेतपत्रिकेनुसार शासकीय खरेदीत कार्यक्षमता व पारदर्शकता यावी यासाठी आवश्यक उपाय व बदल सुचविण्यासाठी शासनाने आता वित्त विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील कार्यगटाची स्थापना केली आहे. विविध विभागांकडून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक फी सवलतीत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘शिक्षण शुल्क निर्धारणा प्राधिकरण’ स्थापन करण्याची कशी आवश्यकता आहे, यासाठीही वित्त सचिवांच्याच अध्यक्षतेखाली दुसरा एक कार्यगट स्थापन केला आहे. या दोन्ही गटात वेगवेगळ्या खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शासकीय खरेदीत कार्यक्षमता व पारदर्शकता येण्याच्या अनुषंगाने कोणकोणते बदल करावेत, काय उपाय करायला हवेत, यासाठी नेमलेल्या अभ्यास गटाच्या अन्य सदस्यांत माहिती तंत्रज्ञान विभागाचे अप्पर मुख्य सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव आणि आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांचा समावेश आहे. हा अभ्यासगट स्थापन करण्याची शिफारस श्वेतपत्रिकेच्या पृष्ठ क्रमांक २९ वर केली होती. याशिवाय राज्याच्या शिक्षण,आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागासह तंत्रशिक्षण व वैद्यकीय शिक्षण विभागाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती आणि सवलतीत मोठ्या प्रमाणात अनागोंदी असल्याच्या घटना घडल्या आहेत. यावरून तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघेंसह वैद्यकीय शिक्षण व आदिवासी विकास मंत्री विजय गावितांना टीकेचे धनी व्हावे लागले आहे.