शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनवृद्धीसाठी सरकारने ११ ग्रामपंचायतींची केली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 06:02 IST

जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी सरकारने ११ ग्रामपंचायतींची निवड केली आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल सागर तट अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना २० लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण पर्यटन वाढून, त्यांची आर्थिक चक्रे गतिमान होण्यास मदत मिळणार आहे.

अलिबाग : जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी सरकारने ११ ग्रामपंचायतींची निवड केली आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल सागर तट अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना २० लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण पर्यटन वाढून, त्यांची आर्थिक चक्रे गतिमान होण्यास मदत मिळणार आहे.रायगडला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर नेण्यासाठी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी तयारीही सुरू केली आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी सरकारने विविध योजना आखल्या आहेत. शहरांमध्ये येणारे पर्यटक ग्रामीण भागांमध्ये पोहोचावेत, यासाठी निर्मल सागर तट अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे समुद्रकिनाºयांच्या स्वच्छतेबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने गावांचा विकास केला जाणार आहे. जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींची यासाठी निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींना किनारा व्यवस्थापन व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २० लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये सागरतट व्यवस्थापन समिती स्थापन केली जाणार आहे. निवड झालेल्या ग्रामपंचायतींना दिल्या जाणाºया निधीचे तीन टप्प्यांमध्ये वाटप केले जाणार आहे. निधीतून किनाºयावरील स्वच्छतेसाठी उपाययोजना करणे, कचराकुंड्या बसविणे, बायोगॅस प्रकल्प, सौरदिवे, पर्यटकांसाठी वाहनतळ, निवारा शेड, रेस्टिंग खुर्च्या, एटीएम व्यवस्था, वाय-फाय सुविधा, स्वच्छतागृह, स्नानगृह यांसारख्या सुविधा विकसित कराव्या लागणार आहेत.अलिबाग तालुक्यातील नागाव, रेवदंडा, आक्षी, मिळकतखार, किहिम आणि आवास या सहा ग्रामपंचायतींचा, तर मुरुड तालुक्यातील काशिद, श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, हरिहरेश्वर, उरण तालुक्यातील पिरवाडी, नागाव ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामधील काही ग्रामपंचायतींना निधीचे वाटपही करण्यात आलेले आहे.