शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात शिपायांची ९०० पदे रद्द , सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 01:09 IST

Peon : यापुढे शिपाई संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगड : राज्यातील शिपाई संवर्गातील पदे रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ९०० शिपाई पदांना या निर्णयाचा थेट फटका बसणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. सरकारने तातडीने हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा; अन्यथा १ जानेवारी २०२१ पासून एकही कर्मचारी शाळेत कामावर जाणार नाही, असा निर्धार केला आहे.नजीकच्या काळात राज्यात शिपायांची ५२ हजार पदे रिक्त होणार आहेत. तर रायगड जिल्ह्यातील सुमारे ९०० पदे रिक्त हाेत आहेत. यापुढे शिपाई संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रातील शिपायांसाठी २० हजार रुपये मानधन, नगरपालिका क्षेत्रात साडेसात हजार रुपये आणि ग्रामीण भागांमध्ये फक्त पाच हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. शिपाई पदाचे काम सर्वत्र समानच आहे; मग मानधनात तफावत का, असा प्रश्न रायगड जिल्हा माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघाचे जिल्‍हाध्‍यक्ष मिलिंद जोशी यांनी केला. कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची भेट घेणार असल्याकडेही जाेशी यांनी लक्ष वेधले. यासंदर्भातील सरकारी निर्णय यापूर्वीही बदलण्‍यात आले आहेत. २३ ऑक्‍टोबर २०१३च्‍या आकृतीबंधाबाबत उच्‍च न्‍यायालयात प्रलंबित याचिकेनुसार पदांबाबत कोणतीही नकारात्‍मक भूमिका घेऊ नये, असे आदेश आहेत. 

टॅग्स :Raigadरायगड