शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गोळेगणी येथील मोरी उखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:35 IST

बससेवा ठप्प : नागरिक त्रस्त; रस्ता वाहून गेल्याने चार गावांचा संपर्क तुटला

प्रकाश कदमपोलादपूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते असून नसल्यासारखे असल्याने अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांत या भागातील एसटी फेऱ्या बंद पडत असल्याचे वास्तव सातत्याने समोर येत आहे. मात्र, तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच गेली काही वर्षे राज्य शासनातर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कामकाज पारदर्शक असल्याचे भासविण्यात येत होते. मात्र, पोलादपुरात पारदर्शकचे पितळ उघडे पडले असून, २७ दिवसांत मोरीसह रस्ता उखडल्याने रविवार, सोमवारी या मार्गावरील बससेवा ठप्प झाली होती. यामुळे चार गावांचा संपर्क तुटला आहे. घटनास्थळाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोलादपूर येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली. त्या वेळी ग्रामस्थांनी हे काम निकृ ष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला.

पावसाळ्याच्या हंगामात सातत्याने पोलादपूरमधील ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय होत असल्याने बस चालविणे शक्य नसल्याचे पत्र सार्वजनिक खात्याला देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी चरई, वडाचा कोंड, रानवडी, घागरकोंड, बोरावळे आदी गावाकडे जाणाºया रस्त्याच्या अलीकडे पोलादपूर बाजूला आणि पलीकडे लाल मातीचा भराव करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सुमारे २०० मीटर्स अंतरावर हा लाल मातीचा आणि मुरमाचा भराव करण्यात आला होता. या वेळी एसटी सेवा ठप्प झाली होती, याची दखल प्रसिद्धी माध्यमांनी घेतल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी घेतली होती. नुकतीच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी पोलादपूर येथे अधिकाºयांची भेट घेत ग्रामीण भागातील रस्त्याबाबत आढावा घेतला होता. त्याचप्रमाणे कशेडी घाटामधील बोगद्याची पाहणी व माहिती घेत सूचना केल्या होत्या. मात्र, गेल्या चार वर्षांत पारदर्शकचा डांगोरा पिटणाºया या खात्याचे पितळ पोलादपूर-गोळेगणी मुख्य मार्गावरील मोरीसह रस्ता खचल्याने उघडे पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गोळेगणी गावाच्या आसपास पावसाचे पाणी रात्यावरून वाहून जाऊ नये यासाठी मोरीचे काम ‘क ’ गटातून करण्यात आले होते. यासाठी सुमारे लाखो रुपये खर्च झाले असून, ठेकेदाराने १५ जून रोजी या कामाला सुरुवात केली होती. मात्र, काही दिवसांतच निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे रविवारी झालेल्या पावसाने सिद्ध के ले आहे.पावसाचे पाणी रस्त्यावरून जोरात वाहत आल्याने रस्त्यावरील डांबरासह भराव वाहून गेला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांची पायपीटया मार्गावरील कुडपण तसेच गोळेगणी, परसुले तुटवली, क्षेत्रपाल या गावाचा संपर्क तुटला असून, बससेवा बंद झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना पुढील गावात जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम खाते पोलादपूरसह इतर अधिकाºयांनी पाहणी के ली. २७ दिवस पूर्ण होत नाही तोच रस्त्यासह मोरी उखडल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले असून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हे काम जून २०१९ ला वर्कऑर्डर झाले. सध्या तात्पुरत्या स्वरूपात मोरीचे काम केले होते. पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. - व्ही. आर. बागुल, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलादपूर