शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील गोकुळेश इमारतीला गेले तडे

By admin | Updated: February 26, 2017 03:00 IST

शहरातील भोईआळी येथील गोकुळेश रहिवासी संकुलाच्या इमारतीला मोठ्या प्रमाणावर तडे गेले असून, आज पहाटे एक कॉलम अचानक खचल्याने इमारतीमधील रहिवाशांमध्ये

महाड : शहरातील भोईआळी येथील गोकुळेश रहिवासी संकुलाच्या इमारतीला मोठ्या प्रमाणावर तडे गेले असून, आज पहाटे एक कॉलम अचानक खचल्याने इमारतीमधील रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली आहे. या इमारतीमधील सर्व २३ फ्लॅटधारकांना आपले फ्लॅट्स त्वरित खाली करण्याच्या सूचना नोटिसीद्वारे नगरपरिषदेने दिलेल्या आहेत.भोई आणि गांधी टॉकीज जवळच आठ वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आलेली असून बिल्डर अंकित धारिया यांनी या इमारतीचे बांधकाम केलेले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या इमारतीच्या भिंतीना तडे जाण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी आरसीसी कॉलम आणि बिम्सनाही मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याचे या इमारतीतील रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत संबंधात बिल्डर्स अंकित धारिया यांच्याकडे रहिवाशांनी तक्रारीही केल्या. मात्र, त्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.शनिवारी पहाटे या इमारतीच्या मध्यभागी असलेल्या कॉलमला अचानक तडे जाऊन त्यातील काँक्रीट खाली कोसळल्याचे तेथील रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. याबाबतची माहिती मिळताच नगराध्यक्षा स्नेहल जगताप, नगरअभियंता शशिकांत दिघे, सुधीर म्हात्रे आदींनी घटनास्थळी भेट देऊन इमारतीची पाहणी केली. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व नागरी १९६५चे कलम १९५ अन्वये सदरची इमारत धोकादायक असल्याचे कारण नमूद करून सर्व फ्लॅटधारकांना फ्लॅट्स खाली करण्याच्या सूचना नगरपरिषदेने माहिती नगरअभियंता शशिकांत दिघे यांनी दिली. (वार्ताहर)इमारतीची दुरवस्था...इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करावे, नगरअभियंता गोकुळेश इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इमारतीची दुरवस्था झाली आहे.अनेक ठिकाणी भिंती व कॉलमला तडे गेले आहेत. या इमारतीचे सर्वात आधी स्ट्रक्चरल आॅडिट करून घ्यावे, अशा प्रकारची नोटीसही रहिवाशांना देण्यात यावी, अशी माहिती नगरअभियंता शशिकांत दिघे यांनी दिली.