शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमधील महिलेचे अवयवदान, पाच रुग्णांना जीवनदान : राज्य सरकारच्या वतीने ताराबाई पवार यांच्या कुटुंबाचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 03:17 IST

गणपती उत्सव काळात छातीत दुखू लागल्याने ४५ वर्षीय ताराबाई पवार यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विजय मांडे कर्जत : गणपती उत्सव काळात छातीत दुखू लागल्याने ४५ वर्षीय ताराबाई पवार यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने तातडीने मुंबईमधील जे. जे. रु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापूर्वी एमजीएम रु ग्णालयात दाखल असताना ताराबाई पवार यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. ५ सप्टेंबर रोजी निधन झाल्यानंतर त्यांचे डोळे, हृदय आणि लिव्हर यांचे तीन वेगवेगळ्या रुग्णांवर तसेच डोळ्यांचे अन्य एका रुग्णावर रोपण करण्यात आले. सर जे.जे. रुग्णालयात दुसरे कॅडेव्हरीक अवयवदान आणि पहिले यशस्वी कॅडेव्हरीक किडनी रोपण करण्यात आले. ताराबाई पवार यांच्या अवयवदानाने चार व्यक्तींना जीवनदान दिल्याने राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या कुटुंबाचा विशेष गौरव करण्यात आला.जे.जे. रुग्णालयात ५ सप्टेंबर रोजी ब्रेन डेड रुग्ण ताराबाई श्रावण पवार अवयवदान प्रक्रि या पूर्ण करण्यात आली. त्यानंतर अवयवदात्या ताराबाई पवार यांचे हृदय याचे फोर्टीस रुग्णालयातील रु ग्णास रोपण करण्यात आले. लिव्हर हे नवी मुंबईतील अपोलो रु ग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णाच्या शरीरात रोपण करण्यात आले. तर ताराबाई पवार यांची एक किडनी ज्युपिटर रु ग्णालयातील एका रूग्णास आणि दुसरी किडनी तसेच दोन डोळे यांचे रोपण मुंबईतील सर जे.जे. रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णास करण्यात आले. त्यांनी चार रूग्णांना जीवनदान व दोन रूग्णांना दृष्टीदान देऊन सामाजिक काम करण्याचा वसा मृत्यूनंतरही कायम ठेवला. कर्जत तालुक्यातील कशेळे येथील श्रावण पवारसारख्या अशिक्षित आणि भटक्या स्वरूपात उदरनिर्वाह करणाºया सामान्य माणसाने आपल्या पत्नीचे अवयवदान करून समाजात मोठा आदर्श निर्माण केला आहे.४ सप्टेंबर रोजी मृत झालेल्या ताराबाई श्रावण पवार यांचे अवयवदान करण्यासाठी जे.जे. रु ग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या नेतृत्वाखाली, रु ग्णालय अधीक्षक डॉ. संजय सुरासे तसेच त्यांचे सहकारी,डॉ. अजय भंडारवार आणि त्यांची टीम, डॉ. भरत शहा आणि सहकाºयांनी करून घेतले. तर किडनीरोपण डॉ. व्यंकट गीते, डॉ. गीता सेठ, समाजसेवा अधीक्षक राठोड, सावरकर, पाटील, डॉ. नंदकर, डॉ. विद्या नागर, डॉ. मधुकर गायकवाड, डॉ. विकास मैंदाड तसेच सर्व कर्मचाºयांनी करून घेतले. रामेश्वर नाईक यांनी जे.जे. रु ग्णालयातील दुसरे अवयवदान यशस्वी केले.