शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

रायगड जिल्ह्यात मुलींची बाजी

By admin | Updated: May 26, 2016 03:12 IST

रायगड जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८४.१९ टक्के लागला. ३० हजार ८८ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनी बाजी मारत मुलांना मागे टाकले आहे. ८९ टक्के मुली

अलिबाग : रायगड जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८४.१९ टक्के लागला. ३० हजार ८८ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनी बाजी मारत मुलांना मागे टाकले आहे. ८९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर ७९.३१ मुले पास झाली. मुंबई विभागात रायगड पाचव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रायगड जिल्ह्याचा निकाल सहा टक्क्यांनी घसरला आहे. जिल्ह्यातील १३ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.सर्वाधिक ८८.९२ टक्के विज्ञान शाखेचा निकाल लागला. त्याखालोखाल वाणिज्य ८८ टक्के, किमान कौशल्य ८१.९२ आणि कला शाखेतील ७४.२५ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिली. पुण्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यांच्या विविध संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी सायबर कॅफेत गर्दी केली होती. स्मार्ट फोनच्या माध्यमातूनही काहींनी निकाल जाणून घेतला. निकाल कळताच विद्यार्थ्यांनी आपापल्या मित्रांसोबत एकच जल्लोष केला.८४.२२ टक्के निकालमहाड : महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ८४.२२ टक्के लागला आहे. मार्च १६ मध्ये झालेल्या या परीक्षेला महाविद्यालयातील ९३४ विद्यार्थ्यांपैकी ७७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांनी अभिनंदन केले आहे.राठी इंग्लिश मिडियमचा शंभर टक्के निकालरोहा : जे. एम. राठी इंग्लिश मिडियम स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. आकांक्षा वाघमारे ही ९०.४६ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे तर समृद्धी झगडे ही ८९.५४ टक्के गुण मिळवून दुसरी, नीलायथ प्रभाकरनने ८५.८५ टक्के गुण मिळवून तिसरी आली.पोलादपूरचा निकाल ७९.२३ टक्के पोलादपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ वाशी नवी मुंबई यांच्यामार्फत फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्य. शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल बुधवार आॅनलाइन जाहीर झाला.या परीक्षेत पोलादपूर केंद्राचा निकाल ७८.२३ टक्के लागला पोलादपूर केंद्रामध्ये चार शाळांचा समावेश आहे. यात विद्यामंदिर पोलादपूर शाळेचा निकाल ८४.६५ टक्के लागला. कापडे हायस्कूलचा ७५.३६ टक्के निकाल लागला आहे. सुंदररराव मोरे कॉलेज चोळईचा ५५.१० टक्के इतका निकाल लागला आहे.वैष्णव ज्युनियर कॉलेज पोलादपूरचा ६२.५० टक्के इतका निकाल जाहीर झाला आहे. आॅनलाइन निकाल जाहीर झाल्याने व विद्यामंदिरची विद्यार्थीसंख्या मोठी असल्याने कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रथम ३ क्रमांकाने कोणते विद्यार्थी उत्तीर्ण झाले याची माहिती उशिरापर्यंत मिळाली नाही.वाणिज्य शाखेमधून किशोरी नाक्ती मुरूडमध्ये प्रथममुरु ड /नांदगाव : सर एस. ए. हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनी किशोरी हरिश्चंद्र नाक्ती हिने वाणिज्य शाखेमधून ८०.९२ टक्के मिळवून तालुक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे. तर कला शाखेमधून तेजस मनीष प्रधान ७८.६१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. सर एस.ए. हायस्कूलचा वाणिज्य व कला शाखेचा निकाल ९१.१० टक्के लागला आहे. अंजुमन हायस्कूल मुरु ड येथे विज्ञान शाखेचा निकाल उत्कृष्ट लागला आहे. इद्रूस आयेशा मुबीन हिने ६७.६९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. फरहाना शकील कोतविलकरने ६७.५४ टक्के गुण मिळाले.फरहानाने द्वितीय क्र मांक पटकावला. बांगी मिनर्झा हसन ६७.३८ गुण मिळवून अव्वल ठरली. विज्ञान शाखेतून ११९ विद्यार्थ्यांपैकी १०७ विद्यार्थी पास झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक जाहिद गोठेकर व उदय गद्रे आदींसह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.तालुकानिहाय निकालतालुकाटक्केवारीपनवेल८९.५५म्हसळा८८.२०उरण८७.५२मुरुड८७.१९पेण८६.४७महाड८६.२९तळा ८६.२७अलिबाग ८५.४६माणगाव८३.९९कर्जत८३.२१पोलादपूर८०.६१रोहे७९.६९सुधागड७७.५२श्रीवर्धन७६.२९खालापूर६४.४४