शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घारापुरी लेणी सोमवारी बंदच, शिवदर्शनापासून शिवभक्त वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 04:02 IST

श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांत शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असताना मात्र, घारापुरी बेटावरील महादेवाची विविध रूपे असलेल्या अतिप्राचीन लेणी पाहण्यासाठी सोमवारीच बंद ठेवले जात आहे.

उरण : श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांत शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असताना मात्र, घारापुरी बेटावरील महादेवाची विविध रूपे असलेल्या अतिप्राचीन लेणी पाहण्यासाठी सोमवारीच बंद ठेवले जात आहे. यामुळे दररोज बेटावर येणाऱ्या हजारो देशी-विदेशी पर्यटक भाविकांना शिवदर्शनाला मुकावे लागत आहे, यामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र असंतोष आहे.घारापुरी बेटावर कलचुरी घराण्याच्या कारकिर्दीत कोरण्यात आलेली अतिप्राचीन कोरीव लेणी आहेत. काळ्या पाषाणात योगेश्वर शिव, रावणानुग्रहमूर्ती, शिवपार्वती, अर्धनारीनटेश्वर, गंगावतरण शिव, शिवपार्वती विवाह, अंधकारसुरवधमूर्ती, नटराज शिव आणि महेशमूर्ती अशी शिवाची विविध रूपे या कोरीव शिल्पात अद्भुतरीत्या कोरलेली आहेत. कोरीव शिल्पांबरोबरच लेणी परिसरातील विविध गाभाºयांत अतिप्राचीन चार शिवलिंग आहेत. त्यापैकी लेणींच्या पश्चिमेलाही पूर्वाभिमुख शिवमंदिर सुमारे २० चौ. मी. छतापर्यंत भिडलेले आहे.शिवमंदिराला चारही दिशांना दारे आहेत. या चारही दारांवर विशाल द्वारपाल तैनात आहेत. मंदिरात चौकोनी शाळुंका असून, अगदी तिच्या मधोमध विशाल लेणींचे मुख्य आकर्षण आहे. शिवाची सकल व निष्कंल अशी दोन रूपे एकसमयावच्छेंदे करून फक्त या लेणींतच आढळतात. अशी ही शिवाची अद्भुत शिल्पे पाहण्यासाठी देश-विदेशी पर्यटकांची वर्षभर नेहमीच गर्दी असते. मात्र, वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या घारापुरी लेणी प्रत्येक सोमवारी पर्यटकांसाठी बंद ठेवली जातात.पुरातत्त्व विभागाकडून दुरुस्ती, देखभालीसाठी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी लेणी बंद ठेवली जातात. सोमवारी येणाºया प्रत्येक महाशिवरात्री उत्सवासाठी पुरातत्त्व विभागाकडून घारापुरी लेणींचे प्रवेशद्वार पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी खुले ठेवले जाते. मात्र, श्रावण महिन्यातील सोमवारी बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे किमान श्रावणातल्या सोमवारी तरी शिवदर्शनासाठी पुरातत्त्व विभागाने लेणींचे प्रवेशद्वार पर्यटक शिवभक्तांसाठी खुले करावे, अशी मागणी शिवसेनेचे उपविभागप्रमुख तथा घारापुरी ग्रा. पं. सरपंच बळीराम ठाकूर यांच्यासह घारापुरी बेटवासीयांनी पुरातत्त्व विभागाकडे केलेली आहे.सोमवारी लेणी पर्यटक आणि शिवभक्तांसाठी खुली करण्यात यावीत, या मागणीसाठी खा. श्रीरंग बारणे यांनाही साकडे घातले आहे. बेटवासीयांच्या मागणीनंतर याबाबत पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नानंतर वेरुळ लेणी आता सोमवारऐवजी मंगळवारी बंद ठेवली जात आहेत. लोकप्रतिनिधी पुरातत्त्व विभागाच्या मुख्य कार्यालयातील अधिकाºयांकडे प्रयत्न केल्यास घारापुरी लेणींचेही सोमवारी शिवभक्त आणि पर्यटकांना दर्शन होऊ शकते, अशी माहिती घारापुरी लेणींचे केअरटेकर कैलास शिंदे यांनी दिली.देशी-विदेशी पर्यटकांची निराशासोमवारी लेणी पर्यटक आणि शिवभक्तांसाठी खुली करण्यात यावीत, या मागणीसाठी खा. श्रीरंग बारणे यांनाही शिवभक्त तसेच घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी साकडे घातले आहे. बेटवासीयांच्या मागणीनंतर याबाबत पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या