शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या मिळवा डॉक्टरांचा मोफत वैद्यकीय सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 00:49 IST

नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

लाेकमत न्यूज नेटवर्करायगड : काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी घरीच राहणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीमध्ये जर काेणालाही घरबसल्या डॉक्टरांकडून मोफत सल्ला घ्यायचा असेल तर…काय करायचे ? असा प्रश्न पडताे. मात्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याचा विचार करुन ‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून एक उत्तम पर्याय दिला आहे.

राज्यात गेल्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीमध्ये सरकारीप्रणित ‘ई-संजीवनी ऑनलाइन मोफत ओपीडी’ सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या माध्यमातून कोणताही गरजू नागरिक घरीच राहून आपल्या आरोग्याविषयी ‘संजीवनी ओपीडी’ या ॲपद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांसोबत मोफत सल्लामसलत करू शकतो, तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला मिळवू शकतो. दरम्यायान, उपयुक्त अशा उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घरबसल्या घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे. या सेवेमुळे रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. 

ई संजीवनी ओ.पी.डी. करिता असे करा रजिस्ट्रेशनnई संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण esanjeevaniopd.in या संकेतस्थळावर भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधू शकतात.nतसेच ॲन्ड्रॉईड मोबाइलमध्ये Google Play Store मध्ये जाऊन esanjeevani OPD National Teleconsultation Service या नावाचे ॲप (App) डाऊनलोड करता येईल.nआपला मोबाईल नंबर OTP (One Time Password) द्वारे सत्यापित (Verify) करा.nमोबाइल नंबर सत्यापित (Verify) झाल्यानंतर टोकन जनरेट करा.nटोकन (TOKEN) जनरेट झाल्यावर लॉग इन करा.nलॉग इन झाल्यावर तुमची माहिती भरुन तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहा व तुमचा नंबर आल्यानंतर कॉल नाऊ (Call Now) वर क्लिक करून डॉक्टरांसोबत सल्लामसलत करा.nई-प्रिस्क्रिप्शन डाऊनलोड करा.

कशी कराल नोंदणी?nसोमवार ते रविवार सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी १.४५ते सायं. ५.०० या वेळेमध्ये या सेवेचा लाभ घेता येईल.nयामध्ये ‘एसएमएस’ द्वारे ई-प्रिस्क्रिप्शनही रुग्णांना प्राप्त होते. ते ई-प्रिस्क्रिप्शन दाखवून रुग्ण नजीकच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ शकतात.nया योजनेचा वापर करताना लॉग इन करताना काेणाला काहीही अडचण येत असेल तर जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग येथे csraigad70@gmail.com या ई मेलवर कळवावे.

टॅग्स :Raigadरायगड