शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय पारदर्शक खरेदीसाठी ‘जेम’ पोर्टल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 05:16 IST

निवासी उप जिल्हाधिकारी पाणबुडे यांचे कार्यशाळेत प्रतिपादन

अलिबाग : शासनाला लागणाऱ्या विविध वस्तू, सेवांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने ‘जेम’ पोर्टल विकसित केले असून, या द्वारे अधिकाधिक पारदर्शक खरेदी व्यवहार करून शासनासाठी उत्तम दर्जाच्या वस्तू आणि सेवा वाजवी दरात घेऊन आर्थिक बचतही होऊ शकते, त्यामुळे ‘जेम’ पोर्टल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर खरेदी व्यवहारांसाठी करावा, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी आज येथे केले.

‘जेम’ पोर्टलद्वारे करावयाच्या खरेदीची, तसेच आॅनलाइन नोंदणी प्रक्रि येबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात उद्घाटन प्रसंगी पाणबुडे बोलत होते. या वेळी उद्योग विभागाच्या उपसंचालक शिरसाठ, ‘जेम’ पोर्टलचे अधिकारी सूरज शर्मा, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक एम. एन. देवराज तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, शासनाच्या सर्व विभाग, शासकीय उपक्र म, महामंडळे व त्या अंतर्गत सर्व कार्यालयांकडून वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने मानवी हस्तक्षेपाशिवाय व खरेदीची संपूर्ण प्रक्रि या आॅनलाइन पद्धतीने राबविण्यासाठी ‘जेम’ पोर्टल विकसित केलेले आहे. राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून या पोर्टलची कार्यपद्धती वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी राज्यामध्ये दिनांक २४ आॅगस्टपासून बंधनकारक केली आहे. या वेळी उपस्थितांना शिरसाठ आणि शर्मा यांनी या प्रणालीबाबत मार्गदर्शन केले.‘जेम’ पोर्टल नोंदणीचे फायदे‘जेम’ पोर्टलवर नोंदणी केल्याने उत्पादक, पुरवठादारांना आपले उत्पादनाचा पुरवठा राज्यस्तरावर किंबहुना देशस्तरावर करणे सोपे होणार आहे. या प्रक्रि येचा अवलंब केल्याने पुरवठादारांना मालाचा पुरवठा केल्यानंतर मालाची रास्त किंमत विहित वेळेत प्राप्त होऊन व्यवहार पारदर्शकपणे होणार आहे. सदरच्या प्रक्रि येमुळे पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदीदार उपलब्ध होऊन मक्तेदारी प्रथा पूर्णपणे नष्ट होईल, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :Raigadरायगड