शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

फणसाड अभयारण्यात रानगव्यांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:53 IST

तालुक्यातील फणसाड अभयारण्यात १२ रानगवे आढळले असून यापूर्वी कधीही असे रानगवे दृष्टीस पडले नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. फणसाड अभयारण्यात प्रथमच रानगवे आल्याने पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरणार आहेत.

- संजय करडेमुरुड : तालुक्यातील फणसाड अभयारण्यात १२ रानगवे आढळले असून यापूर्वी कधीही असे रानगवे दृष्टीस पडले नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. फणसाड अभयारण्यात प्रथमच रानगवे आल्याने पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरणार आहेत.मुरुडपासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्याचे क्षेत्रफळ ५४ चौ.कि.मी. आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे महाबळेश्वर, माथेरान यासारख्या उंच टापूत आढळणाऱ्या वनस्पती येथे पाहायला मिळतात. अभयारण्यात बिबट्या, रानमांजर, सांबर, वानर, भेकर, रानडुक्कर, साळींदर, पिसोरी व मोठी खार अर्थात शेकरू, बिबटे आदी वन्यप्राणी आढळतात. तर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग, अजगर, मण्यार, फुरसे, घोणस, हरणटोळ, धामण आदी सर्पांच्या जाती आढळतात.या जंगलात मोठ्या प्रमाणात ऐन, साग, किंजळ, सावर, कुंभी, भोकर, पांगारा, पायर, करंज, हेद, काजू, डंबर, खवस, कोकम, जारूळ, मोहा, कळंब, अर्जुन आदी वनसंपदा येथे आहे. येथे मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती आढळतात. बारमाही नैसर्गिक झरे आहेत. ग्रामीण बोलीत त्याला गाण असे म्हणतात. अशा सुमारे २७ गाण आहेत. याबरोबरच आता फणसाड अभयारण्यात रानगवेसुद्धा आढळून आले आहेत. या अभयारण्यात या पूर्वी कधीही रानगवे नव्हते; परंतु अचानक त्यांची पैदास वाढलेली दिसून येत आहे. म्हशीसारख्या काळ्या; परंतु यांच्या पायाखालील सफेद भाग तसेच यांच्या शेपटीला सफेद केस असतात. खूप वजनी व प्रचंड खाद्य खाणारे असे रानगवे आहेत. या अभयारण्यात किमान १२ रानगवे आढळून आल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.- हे रानगवे कळपात राहणे अधिक पसंत करतात. वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीमधील काही जंगल भागात हे रानगवे आढळून आले आहेत. आकाराने खूप मोठे असल्याने सर्वसामान्य नागरिक घाबरून जातात. फणसाड अभयारण्यात प्रथमच रानगवे आल्याने पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहेत. शेकरू या दुर्मीळ प्राण्यांबरोबरच आता या जंगलात रानगवे सापडल्याने पर्यटक व वनविभागाने समाधान व्यक्त केले आहे.ज्या जंगलात सधनता असते अशा वेळी रानगवे राहणे अधिक पसंत करतात. फणसाड अभयारण्य दाट असून येथे अनेक मोठे वृक्ष आहेत. तसेच पिण्याचे पाणी सुद्धा मुबलक आहे. आतापर्यंत आमच्या पाहणीत किमान आठ रानगवे आढळून आले आहेत. मात्र, येथील ग्रामस्थांकडून १२ रानगवे निदर्शनास आल्याचे समजले आहे.- प्रदीप चव्हाण,वन परिक्षेत्र अधिकारी, फणसाड

टॅग्स :Raigadरायगड