शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रक्तचंदन तस्करीत वाढ

By admin | Updated: July 10, 2015 22:05 IST

गेल्या काही वर्षांत उरण जेएनपीटी परिसरात रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातून

मधुकर ठाकूर ल्ल उरणगेल्या काही वर्षांत उरण जेएनपीटी परिसरात रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातून जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रक्तचंदनाच्या तस्करीमुळे बंदर संघटित रक्तचंदन माफियांच्या विळख्यात सापडले आहे. कस्टम, पोलीस, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील आठ वर्षांत विविध ठिकाणी आणि काही कंटेनर गोदामांवर धाडी टाकून ६५६.५७७ मे. टनापेक्षा अधिक रक्तचंदनाचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या या रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत अब्जावधी रुपये आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले असले तरी त्यांची संख्या नगण्य आहे. शिवाय मुख्य सूत्रधारांपर्यंत अद्याप तरी सुरक्षा यंत्रणेचे हात पोहोचलेले नाहीत. परिणामी मुख्य सूत्रधार मोकाटच असल्याने रक्तचंदनाची जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरूच आहेत.जेएनपीटी बंदरातून याआधी शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ, सापाची कातडी मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती. चार-पाच वर्षांपासून आता तस्करीमध्ये रक्तचंदनाची भर पडली आहे. परदेशात प्रामुख्याने चीन, मलेशिया, जपान, सिंगापूर आणि आशिया खंडातून भारतातील रक्तचंदनाला मोठी मागणी आहे. लाकडी कलाकुसरीची घरे, घरातील सुबक फर्निचर आणि इतर तत्सम कामांसाठी रक्तचंदनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रक्तचंदनाच्या लाकडामुळे घरातील वातावरण सातत्याने थंड राहते. तसेच लाकडापासून सुबक आणि टिकाऊ फर्निचर तयार होत असल्याने या रक्तचंदनाच्या लाकडाला परदेशात मोठी मागणी आहे. भारतात कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातील जंगलात रक्तचंदनाची लागवड केली जाते. फारच महागडे असल्याचे भारतात रक्तचंदनाच्या लाकडाचा उपयोग गर्भश्रीमंत करतात. देशात या दुर्मीळ रक्तचंदनाच्या एका किलोची किंमत साधारणत: तीन ते चार हजार रुपयांपर्यंत आकारली जाते, तर परदेशात रक्तचंदन १५० डॉलर प्रतिकिलोच्या भावाने विकले जाते. परदेशात रक्तचंदनाच्या लाकडाला मिळणाऱ्या प्रचंड भावामुळे आंतरराष्ट्रीय संघटित माफियांनी रक्तचंदनाच्या तस्करीकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे रक्तचंदनाच्या तस्करीसाठी आता जेएनपीटी बंदराचा वापर मोठ्या प्रमाणात होवू लागल्याचे मागील आठ वर्षांतील अनेक घटनांमुळे उघडकीस येवू लागले असून मूळ आरोपी पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. ------------विविध रक्तचंदनाच्या साठ्याप्रकरणी आठ वर्षांत ६६ केसेस दाखल झाल्या असल्याची माहिती रायगड डीएफओ एन. बी. गुदमे यांनी दिली. परदेशात रक्तचंदन तस्करीच्या टोळ्या वाढल्याचा फायदा मात्र कस्टम, डीआयआर, वनविभाग आणि पोलिसांना होवू लागला आहे.   टोळ्यांमधील खबरेच आता दुश्मन तस्कर टोळ्यांच्या तस्करीची माहिती संबंधित सुरक्षा विभागाला देवू लागल्याने मागील आठ वर्षांत रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्याची क बुलीही संबंधित सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तस्करीची अशी प्रकरणे यापुढे उघडकीस येवू नयेत यासाठी आंतरराष्ट्रीय संघटित माफिया टोळ्यांनी एखाद दुसरा सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांवरच भिस्त न ठेवता कस्टम, डीआरआय, वनविभाग, पोलीस आदी सर्वच विभागातील सरसकट अधिकाऱ्यांना खिशात टाकण्याची धूर्त खेळी करीत असतात.