शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

कुलाबा किल्ल्यात गणेशभक्तांची गर्दी

By admin | Updated: February 11, 2016 02:42 IST

ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यामधील सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये गुरुवारी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणरायाचे दर्शन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

अलिबाग : ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यामधील सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये गुरुवारी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणरायाचे दर्शन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारीपासूनच कुलाबा किल्ल्यात तळ ठोकला असून, उत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. हजारोच्या संख्येने भाविक सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार आहेत.दर वर्षी माघी गणेशोत्सव किल्ल्यातील सिद्धिविनायकाच्या मंदिरात भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. माघी गणेशोत्सवाच्या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविकांची पावले किल्ल्याकडे जातात. स्थानिकांसह पर्यटक मोठ्या संख्येने या दिवशी आपली उपस्थिती लावतात. किल्ल्याचा इतिहास आणि गणरायाचे दर्शन असा दुहेरी संगम त्यांच्याकडून साधला जातो. माघी गणेशोत्सव समितीची पदाधिकारी सदस्य यांनी गेल्या तीन दिवसांपासून परिसराची साफसफाई केली आहे. भाविकांना दर्शन व्यवस्थित घेता यावे, यासाठी अलिबाग नगरपालिकेच्या वतीने मंदिराच्या परिसरात बॅरिकेटस् लावण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हार-फुले, मिठाई, वडापाव, भेळपुरी, पाणीपुरी यांचेही येथे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. मंदिर आणि किल्ल्यात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.भरतीच्या वेळी अलिबाग कस्टम कार्यालय येथील जेटीवरून नेहमीप्रमाणे बोटी किल्ल्यापर्यंत प्रवाशांना नेणार आहेत. (वार्ताहर)