शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

गणेशोत्सवापूर्वी सर्वच खड्डे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:21 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ आॅगस्टपर्यंत भरण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येतील

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ आॅगस्टपर्यंत भरण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात केंद्रीय योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.केंद्रीय मंत्र्यांच्या या आदेशाने महामार्गावरून प्रवास करणाºयांना दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची खड्ड्यांतील प्रवासातून सुटका होणार आहे, गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील चाकरमानी या कालावधीत मोठ्या संख्येने कोकणात येतात. पावसामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी पत्रकारांनी केली. महामार्गावरील खड्डे भरण्याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. १५ आॅगस्टपर्यंत खड्डे भरण्यात येतील, असे गीते यांनी स्पष्ट केले.रोजगार हमी योजनेचा रायगड जिल्ह्यातील शेतकºयांंनाही फायदा व्हावा यासाठी आता शेतकºयांनी त्यांच्या शेतावर घातलेला बांध आणि कंपोस्ट खतांसाठी केलेले खड्डे ही आता रोजगार हमी योजनेच्या कक्षेत धरले जाणार आहेत. त्यामुळे शेतकºयांसाठी ही चांगली योजना असल्याने त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गीते यांनी केले. या आढावा बैठकीच्या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे आदी उपस्थित होते.विकासकामातचालढकल करू नकाठेकेदारासह अधिकाºयांनी विकासकामात चालढकल केली तर, त्याची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा सजड दमच गीते यांनी भरला. विकासकामांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला फ्रीहॅण्डदिला आहे. तुमच्या कामात मी कधीच ढवळाढवळ केली नाही. त्यामुळे कामात दिरंगाई नको आणि ज्यांनी प्रामाणिकपणे कामे केली आहेत त्यांची बिले अडवू नका, अन्यथा माझ्या पद्धतीने काम करावे लागेल, असा इशाराही गीते यांनी दिला.1800शेतकºयांना योजनेचा लाभ1रायगड जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे ८० टक्के लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या आठ दिवसांमध्ये १०० टक्के लावणीची कामे पूर्ण होतील. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाचा हंगाम चांगला जाणार आहे.2सरकारने पीक विमा योजनेमध्येआता भाताच्या पिकालाही संरक्षित केले आहे. हेक्टरी ३९ हजार रुपयांचे संरक्षण मिळणार आहे. यासाठी फक्त एकदाच ७५० रु पये हप्ता शेतकºयांना भरावा लागणार आहे. आतापर्यंत १८ हजार शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून १२९ कोटीरु पयांची विजेसंबंधीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे आताविजेच्या कोणत्याच तक्र ारीराहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.कैद्यांकरितानिधी मंजूरअलिबाग येथील जिल्हा कारागृहातील कैद्यांना रु ग्णालयात नेण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे कारागृहासाठी एक रु ग्णवाहिका मिळावी, अशी मागणी जिल्हा कारागृह अधीक्षकांनी गीते यांच्याकडे अर्जाद्वारे केली. त्याला तत्काळ मंजुरी देत त्यांनी नऊ लाख २५ हजार ७४५ रु पयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे कारागृहातील कैद्यांसाठी आता रुग्णवाहिका उपलब्ध होण्यातील अडथळा दूर झाला आहे.‘रोहयो’साठी निधीरायगड जिल्ह्यात रोजगार हमी योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी आहे; परंतु जिल्ह्यात जॉबकार्ड असणाºयांची संख्या खूपच कमी असल्याची माहितीकें द्रीय मंत्रीअनंत गीते यांनी दिली.