शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गॅस अपहार प्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:09 IST

मुंबईतील चेंबूर परिसरातील गॅस कंपनीतून लिक्वीड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) टॅँकरमधून घेऊन अलिबाग तालुक्यातील साळाव येथील गॅस बॉटलिंग प्लॅन्टमध्ये पोहोच करण्याकरिता दिला असता

विशेष प्रतिनिधी अलिबाग : मुंबईतील चेंबूर परिसरातील गॅस कंपनीतून लिक्वीड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) टॅँकरमधून घेऊन अलिबाग तालुक्यातील साळाव येथील गॅस बॉटलिंग प्लॅन्टमध्ये पोहोच करण्याकरिता दिला असता, तो वाटेतच पुणे जिल्ह्यातील मंचर येथील एलपीजी पंप चालकास विकणारा टॅँकरचालक राम गुंडाजी एचे (रा. लातूर), चेंबूरमधील गॅस कंपनीतील मध्यस्त रॉबर्ट जॉन मायकल आणि मंचर येथील एलपीजी पंपचालक किरण गुलाब सैद या तिघांवर गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ तीन दिवसांत मुद्देमालासह अटक करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे.१८ जुलै रोजी दुपारी ४ ते २१ जुलै रोजी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान टँकरचालक राम गुंडाजी एचे याने त्याच्या ताब्यात असलेला टँकर न. एमएच-४३/वाय-२६९२मध्ये चेंबूर येथील गॅस कंपनीमधून १७ हजार ५८० किलो वजनाचा एलपीजी गॅस भरून अलिबाग तालुक्यातील उसर येथील गॅस कंपनीमध्ये पोहोच करण्याकरिता दिला होता. मात्र, चालक राम गुंडाजी एचे याने चेंबूरमधील गॅस कंपनीतील मध्यस्त रॉबर्ट जॉन मायकल यांच्याशी आपसात संगनमत करून, यापैकी ३ हजार किलो एलपीजी गॅस पुणे जिल्ह्यातील मंचर येथील गॅस पंपचालक किरण गुलाब सैद यांस विकला. त्यानंतर चालक राम गुंडाजी एचे याने या टँकरमध्ये पाणी भरून, पाणीमिश्रित एलपीजी गॅस उसर येथील गॅस कंपनीत जमा करण्यासाठी आणला.रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक एन. डी. सस्ते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने या प्रकरणातील तिघांना अटक के ली.