शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पनवेलमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा; कोरोनाबाबतचे  प्रशासनाचे नियम पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 00:24 IST

मास्कचा वापर अयोग्य, ८० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक मास्कचा वापर करीत आहेत. मात्र हा मास्क योग्यरीत्या वापरला जात नाही

वैभव गायकरपनवेल : राज्यभरात दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. पनवेल महानगरपालिकेने साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार नागरिकांना विविध नियमावली घालून दिली आहे. कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आदींसह विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना देऊनही नागरिकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसते आहे. त्यामुळे पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची भीतीच नसल्याचे चित्र आहे.पालिका क्षेत्रातील खारघर, कामोठे कळंबोली, पनवेल आदी ठिकाणच्या परिसरातील नागरिक सर्रास पनवेल महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सूचना पायदळी तुडवत असल्याचे चित्र रिॲलिटी चेक दरम्यान दिसून आले. 

८० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक मास्कचा वापर करीत आहेत. मात्र हा मास्क योग्यरीत्या वापरला जात नाही, असे दिसले. हा मास्क तसाच गळ्यात अडकवलेला अथवा हनुवटीवर ठेवलेला दिसून येत आहे.  शहरातील दुकानदारही  याचप्रकारे मास्कचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः उघड्यावर थुंकणे, मास्कचा वापर टाळणे अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन नागरिक उघडपणे करीत आहेत. याशिवाय बाजारात होणारी गर्दी डोकेदुखी ठरली आङे.  प्रशासनाची भीती नागरिकांना नसल्याने हे प्रकार घडत आहेत. सामाजिक अंतराचा मोठ्या प्रमाणात फज्जा उडाल्याचे दिसते आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोविडच्या रुग्णांचा आकडा २५ हजार ३७४ पर्यंत पोहोचला आहे. यापैकी २४ हजार १२१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, तर ५७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पालिका प्रशासन कोविडबाबत सर्वतोपरी उपाययोजना राबवून साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीदेखील कोविडचे गांभीर्य लक्षात घेता स्वतःहून शासनाच्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. - सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

नागरिकांनी स्वत:हून नियमांचे पालन करावेपालिकेकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. मात्र सातत्य नसल्याने नागरिक कोविडबाबत नियमांचे पालन करण्यास उदासीन आहेत. पालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानाने व प्रशासनातील मनुष्यबळाच्या अभावामुळे प्रत्येक ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांना पोहोचणे शक्य नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या