शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भिरा जलविद्युत प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा

By admin | Updated: July 27, 2016 03:11 IST

माणगाव तालुक्यातील भिरा जलविद्युत प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक करून ताब्यात घेतलेल्या जमिनी तत्काळ परत करा, या मागणीसाठी सर्वहारा आंदोलनाच्या नेत्या उल्का

महाड : माणगाव तालुक्यातील भिरा जलविद्युत प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक करून ताब्यात घेतलेल्या जमिनी तत्काळ परत करा, या मागणीसाठी सर्वहारा आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखाली माणगाव प्रांत कार्यालयावर मंगळवारी प्रकल्पग्रस्तांचा भव्य मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात विळे, पाटणूस, वरची वाडी, भाऊची आळी, भैरीची वाडी, खाळजे, म्हसेवाडी, लव्हली वाडी, साजे व भिरा गावातील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.१९८१ मध्ये भिरा जलविद्युत प्रकल्पासाठी केवळ माती काढण्यासाठी नाममात्र मोबदला देऊन शासनाने या परिसरातील १० ते १२ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर १५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सुमारे १,२०० एकर जमीन विनावापर केवळ माती काढण्यासाठी शासनाने ताब्यात घेतल्या, या जमिनीची सातबारापत्रकी ‘भिरा प्रकल्प महाराष्ट्र शासन’ अशा नोंदी पडल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या शेतकऱ्यांच्या लक्षात आले. ही फसवणूक होऊनही संयम बाळगत प्रकल्पग्रस्त दाखल्याची मागणी करूनही आजतागायत हे दाखले शेतकऱ्यांना दिले गेले नाहीत. तर निवाड्याची मागणी करूनही निवाडे दिले जात नसल्याने शेतकऱ्यांना अंधारात ठेवून शासनाने जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप यावेळी आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी केला.नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ च्या कलम २४ प्रमाणे शासनाने ताब्यात घेतलेल्या जमिनी संपादन केल्यापासून पाच वर्षे विनावापर पडून राहिली असेल, तर अशी जमीन मूळ मालकांना किंवा वारसांना परत करण्याची कार्यवाही करता येते. रक्कम वेळोवेळीच्या व्याजदराने बँके त भरूनताबा घेतल्याच्या तारखेपासून बोजाविरहित जमीन मूळ मालकांना परत करता येते, अशी तरतूद असल्याचे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)