शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उरण नगरपरिषदेविरोधात मोर्चा

By admin | Updated: August 10, 2016 03:17 IST

उरण परिवर्तन महाआघाडीच्या उरण परिवर्तन संघर्ष समितीच्या वतीने शहरातील विविध समस्यांच्या विरोधात उरण नगर परिषदेवरच मोर्चा काढण्यात आला

उरण : उरण परिवर्तन महाआघाडीच्या उरण परिवर्तन संघर्ष समितीच्या वतीने शहरातील विविध समस्यांच्या विरोधात उरण नगर परिषदेवरच मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी (९) काढण्यात आलेल्या मोर्चात महाआघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शेकाप आदि घटक पदाधिकाऱ्यांसह सुमारे १५० नागरिक सहभागी झाले होते. उनपवर मागील १५ वर्षांपासून सेना- भाजपाची सत्ता आहे. मात्र सत्ताकाळात उरण शहरवासीयांच्या समस्या दूर करण्याऐवजी वाढविण्याचे काम केल्याचा आरोप करीत महाआघाडीने मोर्चा काढण्याचा निर्धार जाहीर केला होता. माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. मात्र विवेक पाटील पेन्शनर पार्कपर्यंत वेळीच पोहोचलेच नाहीत. त्यामुळे ताटकळत राहिलेल्या मोर्चेकऱ्यांनी पेन्शनर पार्कपासून मोर्चाला प्रारंभ केला. शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चात उरण परिवर्तन महाआघाडीचे निमंत्रक महेंद्र कांबळे, काँग्रेसचे रायगड जिल्हा चिटणीस महेंद्र ठाकूर, मिलिंद पाडगावकर, तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी आदिंसह महाआघाडीतील घटक पक्षांचे अन्य पदाधिकारी, १५० नागरिक सहभागी झाले होते. महाआघाडीने सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप करीत शहरातील समस्यांचा पाढा वाचला. यावेळी मोर्चात उशिराने सहभागी झालेले माजी आ. विवेक पाटील आणि महाआघाडीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शहरवासीयांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत निवेदनही देण्यात आले. (वार्ताहर)