शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेताजवळच मिळणार ताजा भाजीपाला, कलिंगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 23:58 IST

सुधागड तालुक्यातील बलाप येथे विक्री केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क पाली : सुधागड तालुक्यातील बलाप येथे भाजीपाला व कलिंगड विक्री केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती पाली-सुधागड सभापती रमेश सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रावर शेतातील ताजा भाजीपाला व कलिंगड शेताजवळच मिळणार आहे

'विकेल ते पिकेल' या संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान राज्यात राबविण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या विक्री केंद्रावर शेतकरी धर्मा हंबीर, उमाजी हंबीर व रमेश हंबीर यांच्या शेतातील भाजीपाला विक्रीस उपलब्ध होणार आहे, तसेच राजेंद्र खरिवले यांच्याकडील कलिंगडदेखील विक्रीस उपलब्ध होणार आहेत. हे विक्री केंद्र भाजीपाला लागवड क्षेत्राशेजारी असल्याने ग्राहकांना शेतातील ताजी भाजी व कलिंगड रोज उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्राजक्ता पाटील यांनी केले. या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती रमेश सुतार, तालुका कृषी अधिकारी जे. बी. झगडे, कृषी अधिकारी चौधरी, कृषी अधिकारी बी. सी. वाळके, मंडळ कृषी अधिकारी व्ही. एल. माने, कुंभारशेत सरपंच सुनील ठोंबरे, उपसरपंच किशोर खरीवले, माजी सरपंच दिलीप खरीवले, संदीप खरीवले, तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहायक व इतर शेतकरी उपस्थित होते.

'विकेल ते पिकेल' बाबत मार्गदर्शन nयावेळी तालुका कृषी अधिकारी जे. बी. झगडे यांनी 'विकेल ते पिकेल' संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले. तालुक्यात अशा प्रकारची विक्री केंद्र सुरू करण्याचे नियोजन असून, लवकरच इतरही ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Raigadरायगड