शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी रुद्र पठणाची ‘स्त्री’मुक्ती

By admin | Updated: August 15, 2015 22:53 IST

‘रुद्र ’ किंवा ‘रुद्राध्याय’ या नावाने ओळखल्या जाणारा मंत्र समूह ‘कृष्णयजुर्वेदातील’ अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून मानला जातो. रुद्राचा जप अथवा पठण महापातकांचा नाश करून विश्वकल्याण

अलिबाग : ‘रुद्र ’ किंवा ‘रुद्राध्याय’ या नावाने ओळखल्या जाणारा मंत्र समूह ‘कृष्णयजुर्वेदातील’ अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून मानला जातो. रुद्राचा जप अथवा पठण महापातकांचा नाश करून विश्वकल्याण साध्य करण्यासाठी एकमेव प्रभावी अस्त्र मानले जाते. यजुर्वेदाचा सारभूत भाग म्हणजे रुद्राध्याय आहे. सामान्य माणसांनी रुद्राचा जप तर करावाच पण संन्याशांनीही तो अवश्य करावा, असे शास्त्रकार सांगतात. परंतु ‘रुद्रा’चा जप वा पठण केवळ पुरुषांनी करावे ते महिलांनी करू नये, अशी एक पुरुषी मर्यादा घातली गेली होती. परंतु आता ‘रुद्र्र’पठणाचे स्वातंत्र्य महिलांनी देखील घेतले असून, शनिवारी श्रावण प्रतिपदा आणि भारतीय स्वातंत्र्यदिन असे आगळे औचित्य साधून येथून जवळच असलेल्या बामणगाव-वढाव येथील उमा महेश्वर देशमुख यांच्या निवासस्थानी अलिबाग परिसरातील तब्बल ३३ महिलांनी सामूहिक लघुरुद्र पठणाचा मंत्रघोष करून, भारतीय स्वातंत्र्यदिनी रुद्र पठणाची स्त्रीमुक्ती सिद्ध केली आहे.छबाराव जोशी गुरुजींचा पुढाकाररुद्र पठणाचा अधिकार हा महिलांनाही आहे. त्यांचा हा पुण्यकर्माचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशी भूमिका स्वीकारुन अलिबागेत गेल्या दहा वर्षांपूर्वी छबाराव जोशी गुरुजींनी पुढाकार घेतला. त्यावेळी त्यांच्या भूमिकेस काहींनी विरोध केला होता.‘राष्ट्रभक्ती’ अन् ‘देवभक्ती’ची अनोखी प्रचितीअलिबागेतील महिलांचा पहिला रुद्र पठणाचा जयघोष डॉ. हेमा देशमुख यांच्याकडे झाला. शनिवारी उमा महेश्वर देशमुख या शिवलिंगास जलाभिषेक करीत असताना माधुरी सुरेंद्र जोशी, अ‍ॅड. स्वाती संजय कुलकर्णी, संस्कृतच्या प्राध्यापिका संपदा देशपांडे, स्मिता महेश गोडबोले आदी ३३ महिलांनी अस्खलित संस्कृतातील १२१ रुद्र मंत्र आवर्तने सामूहिकरीत्या करुन लघुरुद्र साकारताना वातावरण भक्तिमय झाले होते.‘नमक व चमक’चा बनतो रुद्राध्याय‘रुद्र ’ किंवा रुद्राध्यायाचे ‘नमक’ आणि ‘चमक’ असे दोन भाग आहेत. प्रत्येक विभागात ‘अकरा’ अनुवाक दहा ते पंधराच्या दरम्यान मंत्र आहेत. ‘नमक ’ विभागातील काही मंत्राच्या शेवटी ‘नम:’ शब्द आहे. ‘चमक’ विभागात काहीवेळा ‘चमे’ हा शब्द सुरुवातीला येतो.