शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या बंदराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 03:01 IST

जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. चौथ्या बंदराचे अधिकृतपणे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (१८फेब्रुवारी) मुंबई विमानतळाच्या पायाभरणीप्रसंगी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नौकानयन मंत्रालयाचे सेक्रेटरी गोपाळ कृष्णन यांनी दिली.

उरण : जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. चौथ्या बंदराचे अधिकृतपणे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (१८फेब्रुवारी) मुंबई विमानतळाच्या पायाभरणीप्रसंगी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नौकानयन मंत्रालयाचे सेक्रेटरी गोपाळ कृष्णन यांनी दिली.जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमटी) चौथे बंदर आणि जेएनपीटी बंदराच्या विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल आणि जेएनपीटीचे इतर अधिकारी उपस्थित होते. जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या चौथ्या बंदरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण के ल्या आहेत. ७९१५ कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचा पहिला टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याच्या कामावर ४७१९ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून चौथ्या बंदरातून २४ लाख कंटेनरची हाताळणी केली जाणार आहे.चौथ्या बंदराच्या दुसºया टप्प्याचे काम २०२२ सालापर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर चौथ्या बंदरामुळे जेएनपीटी कंटेनर हाताळणीची क्षमता दुपटीने वाढणार आहे. जगातील अग्रेसर असलेले मर्क्स, सिंगापूर, दुबई पोर्ट आदी बंदरे जेएनपीटीत काम करीत असल्याने बंदरातून आता मौल्यवान सामान कुठल्याही देशात आयात-निर्यात करू शकतो. त्यामुळे लवकरच जेएनपीटी बंदर जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर पोहोचेल असा विश्वास केंद्रीय नौकानयन मंत्रालयाचे सचिव गोपाळ कृष्णन यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRaigadरायगड