शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार पेंढ्या खाक

By admin | Updated: January 25, 2017 04:57 IST

तालुक्यातील वदप गावातील प्रगत शेतकरी विनय वेखंडे यांनी साठवून करून ठेवलेला गुरांचा चारा अचानक लागलेल्या आगीत जळून खाक

कर्जत : तालुक्यातील वदप गावातील प्रगत शेतकरी विनय वेखंडे यांनी साठवून करून ठेवलेला गुरांचा चारा अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला. साधारण ४००० पेंढ्यांच्या मोळ्या जळून खाक झाल्याने वेखंडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जत नगरपालिकेचे अग्निशमन करणारी गाडी घटनास्थळी पोहोचल्याने आजूबाजूच्या घरांचे नुकसान टळले.राजनाला कालवा परिसरात मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. वदप येथील विनय वेखंडे यांच्याकडे शेतीची कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुरे असून त्यांना चारा लागत असल्याने वेखंडे यांच्यासारखे मोठे शेतकरी चारा साठवून ठेवतात. प्रामुख्याने भाताच्या आणि गवताच्या मोळ्या स्वरूपातील चाऱ्याची साठवण करुन ठेवली जाते. वेखंडे यांनी घराच्या बाजूला आसपासच्या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ४००० चाऱ्याच्या पेंढ्या साठवून ठेवल्या होत्या. विनय वेखंडे २४ जानेवारी रोजी सकाळी शेतीची कामे करण्यात व्यस्त होते. सकाळी साडे नऊच्या सुमारास चारा ठेवलेल्या मोळींना आग लागली. आग वाढत जात असल्याचे पाहून वेखंडे यांनी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांना फोन करून माहिती दिली.२० मिनिटात कर्जत नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा वदप गावात पोहचली. तोपर्यंत त्यांच्या घरासमोरील ४००० पेंढ्या जळून खाक झाल्या होत्या. बंबाच्या साहाय्याने आग वाढणार नाही याची तात्काळ काळजी घेतल्याने आजूबाजूच्या घरांना निर्माण झालेला धोका टळला. या अचानक लागलेल्या आगीमुळे वेखंडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. साधारण चार ते पाच रुपये दराने एका पेंढीची विक्री होत असते. साठवूण ठेवलेल्या सर्व ४००० पेंढ्या खाक झाल्याने आता पुन्हा आर्थिक झळ सोसून वेखंडे यांना चारा खरेदी करावा लागणार आहेत. मात्र पुन्हा एवढा चारा मिळणे कठीण असल्याने वेखंडे यांच्याकडील गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.