शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांचा थकला पगार

By admin | Updated: November 3, 2015 00:50 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ठेकेदारी पध्दतीवर काम करणाऱ्या ६१ कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासूनचे सुमारे ३० लाख रुपयांचे वेतन थकले आहे.

- आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ठेकेदारी पध्दतीवर काम करणाऱ्या ६१ कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासूनचे सुमारे ३० लाख रुपयांचे वेतन थकले आहे. सरकारकडे निधी नसल्याने २०१५-१६ या आर्थिक वर्षातील सुमारे दीड कोटी रुपये अद्यापही रायगड जिल्हा परिषदेकडे वर्ग केले नसल्याचे समोर आले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच निधी कमतरतेचा बार फुटल्याने कर्मचारी मात्र चांगलेच हादरले आहेत.२००५ सालापासूनच सरकारने कर्मचाऱ्यांच्या नवीन भरतीवर बंधने आणली आहेत. सध्याच्या सरकारनेही ठेकेदारी पध्दत सरकारी सेवेत मान्य केल्याने रायगड जिल्हा परिषदेमध्येही खासगी ठेकेदाराकडून आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली आहे. ३४ वाहन चालकांसह २९ सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. जून २०१५ मध्ये याबाबतची नवीन निविदा प्रक्रिया पार पडली होती. वाहन चालकांना १३ हजार ९०० प्रत्येकी आणि २९ सफाई कर्मचाऱ्यांना सुमारे १० हजार रुपये प्रत्येकी वेतन मंजूर केले आहे. एक वर्षासाठी सुमारे दीड कोटी रुपयांच्या निधीची मागणी सरकारकडे आरोग्य उपसंचालक यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मात्र सरकारकडे निधीची तरतूद नसल्याने त्यांच्याकडून निधी वर्ग झालेला नाही. सरकारकडून लवकरात लवकर निधी प्राप्त व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली.महिन्याच्या २५-२६ दिवस मेहनत करायची मात्र महिन्याच्या शेवटी मात्र हातात एकही रुपया पडत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ठेकेदाराकडे पगार मागितला तर तो म्हणतो आरोग्य विभागाने बिले काढलेलीच नाहीत. आरोग्य विभागाकडे निधी वर्ग झाला नसल्याने ते पगार देऊ शकत नाहीत. घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. दिवाळी काही दिवसांवरच येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे सण कसा साजरा करायचा अशा चिंतेत हे कर्मचारी आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी (प्रशासन) प्रकाश खोपकर यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.एक वर्षासाठी सुमारे दीड कोटी रुपयांच्या निधीची मागणी सरकारकडे आरोग्य उपसंचालक यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मात्र सरकारकडे निधीची तरतूद नसल्याने त्यांच्याकडून निधी वर्ग झालेला नाही. सरकारकडून लवकर निधी प्राप्त व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.