शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनदीवरील चार पुलांना मंजुरी, कर्जत तालुक्यातील वाहतूककोंडी सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:15 IST

कर्जत तालुक्यातील उल्हासनदीवरील पूल जुना झाला आहे.

- विजय मांडेकर्जत : तालुक्यातील उल्हासनदीवर पाच नवीन पूल बांधावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्यातील चार पुलांना सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. या पुलांसाठी राज्य सरकारने तब्बल २० कोटींची तरतूद केली आहे. पुलांमुळे कर्जत तालुक्यातील दळणवळणाची सुविधा चांगली होणार आहे.कर्जत तालुक्यातील उल्हासनदीवरील पूल जुना झाला आहे. अरुंद पुलामुळे होणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नवीन पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या प्रकरणी माजी आमदार सुरेश लाड यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात कर्जत तालुक्यातील मागणी होत असलेल्या पाच पुलांपैकी चार पुलांचे बांधकाम करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पुढील दोन वर्षांत पुलांची उभारणी पूर्ण करण्याचे आदेश शासनाने निविदेत दिले आहेत.तालुक्यातील दहिवली-मालेगाव येथे असलेला कमी उंचीचा पूल पावसाळ्यात सतत पाण्याखाली जातो, त्यामुळे नव्याने पूल बांधताना उंची वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, शासनाने या पुलाला कामास मान्यता दिली नाही. यंदाच्या पावसाळ्यात दोन वेळा पूल पाण्याखाली गेला, इतकेच नव्हे तर तब्बल ३० तास पुराचे पाणी पुलावरून वाहत होते. त्यामुळे २५ वर्षांपूर्वीचा हा पूल धोकादायक बनला असून, कोसळण्याची शक्यता आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.उल्हासनदीवर आमराई येथील श्रीराम पूल येथे नवीन पूल मंजूर झाला आहे. पुलाच्या बांधकामामुळे कर्जत-मुरबाड रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे. आता कर्जत-मुरबाड रस्त्याचे राष्टÑीय महामार्गात रूपांतर झाल्याने वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.शेलू-मोहिली यांना जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामास मंजुरी दिली असून, या पुलाचे अंतर २०० मीटर असल्याने स्थापत्य अभियंते यांच्यासाठी हा पूल आव्हानात्मक असेल. शेलू येथील गणेशघाट येथे पुलाला सुरुवात होणार आहे. याच उल्हासनदीवर चांदई येथे पूल बांधण्यात येणार असून, सध्या असलेल्या अरुंद पुलाच्या बाजूला नवीन पूल उभारला जाणार आहे. चिंचवली-कडाव-तांबस- जांभिवली-वेणगाव-दहिवली-कोंडीवडे या राज्यमार्गावर हा पूल आहे.उल्हासनदीवर शिरसे बंधाºयाखालील पुलाचे बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. येथील पुलामुळे नेवाळी, मोहिली, आवळस या भागातील आणि पळसदरी स्थानकाकडे जाणाºया लोकांसाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Karjatकर्जत