शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगड ‘क’ पर्यटनक्षेत्र

By admin | Updated: August 16, 2015 23:42 IST

छत्रपती शिवाजी महाराजांंच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले रायगडावर भारत देशासह जगभरातून शिवप्रेमी व पर्यटक येत असतात. मात्र किल्ले रायगड अजूनही

बिरवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांंच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले रायगडावर भारत देशासह जगभरातून शिवप्रेमी व पर्यटक येत असतात. मात्र किल्ले रायगड अजूनही ‘क’ पर्यटनक्षेत्रात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण या तालुक्यांतील गावे ‘ब’ पर्यटन क्षेत्रात येत असल्याची मंजुरी महाराष्ट्र शासनाने १९९६ साली दिली आहे. त्यानंतर २००५, २०१०, २०११ पर्यंत रायगड जिल्ह्यात ७५ पर्यटनक्षेत्र येत असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागामार्फत महाड तालुक्यातील पाचाड, गांधारपाले, आंबेशिवथर, दासगाव, भेराव, पिंपळवाडी, बिरवाडी या ग्रामपंचायतींना रायगड जिल्हा पर्यटनस्थळ विकासकामे करण्याबाबत १७ जुलै २०१५ च्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये किल्ले रायगडचा समावेश असून या पर्यटनस्थळांवर पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविणे, अस्तित्वातील पाण्याच्या सुविधांचे नूतनीकरण करणे अशा विषयांचे प्रस्ताव या कार्यालयामार्फत करण्यात येणार आहेत. ही योजना पूर्ण करून दिल्यानंतर योजनेतील देखभाल दुरुस्ती करण्याबाबतचे ठराव ग्रामसभेच्या मासिक सभेच्या विहित नमुन्यात उपविभागाकडे पाठविण्यात यावेत. हे ठराव प्राप्त झाल्यानंतरच पर्यटनस्थळावरून पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागामार्फत तयार केला जाईल. हे ठराव या कार्यालयास प्राप्त न झाल्यास पर्यटनस्थळी पाणीपुरवठा न मिळाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नसल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे उपविभाग महाड यांच्यामार्फत सूचित केले आहे. या यादीमध्ये किल्ले रायगडसह महाड शहर बिरवाडी ग्रामपंचायतीमधील श्री देव बहिरी मंदिर, पोलादपूर तालुक्यातील कांगोरीगड, उमरठ, सूर्याजी मालुसरेंची समाधी, महाड गांधारपाले येथील कोरीव लेणी, शिवथर घळई या सर्व पर्यटनस्थळांचा ‘क’ गटामध्ये समावेश आहे. (वार्ताहर)