शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगवाडीत भातशेतीवर वनविभागाची कारवाई! आदिवासी, श्रमजीवी संघटना करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 23:43 IST

कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीत तेलंगवाडी आदिवासीवाडी असून, येथील शेतकरी पूर्वीपासून भातशेती करत असतात; परंतु ते कसत असलेली जमीन ही वनविभागाच्या ताब्यात आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील तेलंगवाडी येथील आदिवासी बांधव वाडवडिलांपासून भातशेती करत आहेत; परंतु ही जागा वनविभागाच्या ताब्यात आहे. या जागेत पूर्वीपासून आदिवासी बांधव भातशेती लावत आहेत; परंतु कोणतीही सूचना न देता लावलेली भातशेती पोलिसांनी आणि वनविभागाने उद्ध्वस्त केली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर आदिवासी संघटना आणि श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे.कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीत तेलंगवाडी आदिवासीवाडी असून, येथील शेतकरी पूर्वीपासून भातशेती करत असतात; परंतु ते कसत असलेली जमीन ही वनविभागाच्या ताब्यात आहे. दरवर्षी आदिवासी बांधव तिथे भाताचे पीक घेत असतात; परंतु यावर्षी लावलेली भातशेती वनविभाग आणि पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना, नोटीस न देता भाताचे पीक मशिनने कापून आणि हातानेउद्ध्वस्त केले आहे. तसेच येथील आदिवासी बांधवांना पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप केला आहे.निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा- या सर्व प्रकारचा आदिवासी बांधवांनी निषेध केला असून आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. आदिवासी समाजावर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी, अन्याय दूर करण्यासाठी श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने सोमवारी कर्जत प्रांत कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. यात आचारसंहितेचा भंग झाल्यास हे वन अधिकारी आणि पोलीस जबाबदार राहतील, असा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे. तसेच आमच्या शेतीच्या नुकसानीची भरपाई त्वरित न दिल्यास आम्ही सर्व आदिवासी बांधव मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशाराही आदिवासी बांधवांनी दिला आहे.तेलंगवाडी येथे वाडवडिलांपासून आम्ही भातशेती करत आहोत. ती जागा वनविभागच्या अखत्यारित येते; परंतु शेती लावण्याच्या अगोदर जर सूचना दिली असती तर शेती लावली नसती. पीक तयार झाल्यानंतर वनविभाग आणि पोलिसांनी ही भातशेती उद्ध्वस्त केली असल्याने आमच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या संदर्भात आम्ही पोलीस आणि वनविभागाच्या विरोधात आंदोलन करणार आहोत.- जानू मोतीराम पादीर, शेतकरी, तेलंगवाडीवनविभागाने अतिक्रमण काढण्यासंदर्भात लेखी पोलीस स्टेशनला कळविले होते, त्यानुसार बंदोबस्त देण्यात आला होता. भातशेती काढून टाकण्याची कारवाई वनविभागाने केली आहे.- केतन सांगळे, पोलीस उपनिरीक्षक, नेरळतेलंगवाडी हद्दीत ३३ कोटी वृक्ष अंतर्गत १३ हजार रोपांची लागवड केली आहे. त्या लागवडीमध्ये आदिवासींनी भात लागवड केली आहे. या संदर्भात त्यांना अनेक वेळा सूचना केल्या होत्या. वन हक्क कायद्यांतर्गत तक्रारी किंवा दावा दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. मंजुरीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवून देऊ, असेदेखील सांगण्यात आले होते; परंतु तसे काही त्यांनी केले नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.- जे. एम. सुपे, वनपाल, बोरगाव

टॅग्स :Raigadरायगड