शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीकरिता शेकापने केला पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:05 IST

राज्यात पुरोगामी विचार टिकवण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे. राज्याच्या राजकारणात देखील शेकापची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे.

नेरळ : राज्यात पुरोगामी विचार टिकवण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे. राज्याच्या राजकारणात देखील शेकापची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. शेतकरी कर्जमाफीकरिता शेकापने सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीमध्ये देखील सरकारला शेकापला स्थान द्यावे लागल्याचे प्रतिपादन शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाचा ७० वा वर्धापन दिन २ आॅगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात साजरा करण्यात आला, यावेळी आ.पाटील बोलत होते.कोकण पदवीधर मतदार संघासह यंदा झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेकापने बाजी मारली आहे. विजयाची ही परंपरा कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना सन १९२५ मध्ये झाली आणि देशाला स्वातंत्र्य सन १९४७ ला मिळाले, मात्र देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत या बावीस वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही हुतात्मा झाला नाही किंवा स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा काही सहभाग राहिला नाही. ब्रिटिशधार्जिणी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यावेळी स्वीकारल्याने ही परिस्थिती होती, हा इतिहास विचारात घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आ.जयंत पाटील यांनीके ले.यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी प्रास्ताविकात मागील काळात पार पडलेल्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाने देदीप्यमान कामगिरी केली. कर्जत, माणगाव, पनवेल या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले, तसेच अलिबाग, पेण, उरण खोपोली, मुरु ड व श्रीवर्धनमध्येही पक्षाला चांगले यश मिळाले असून जिल्हा परिषद निवडणुकीत ५९ जागांपैकी २३ जागांवर विजय मिळविण्यात यश आले, त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. त्यानंतर अनेक तालुका आणि जिल्हा चिटणीस पदांवर नियुक्त्या केलेल्यांची नावे जाहीर यावेळी करण्यातआली.यावेळी आमदार बाळाराम पाटील,आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार विवेक पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जे. एम. म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.