शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर

By admin | Updated: September 12, 2016 03:17 IST

पनवेल शहरात डेंग्यू यासारख्या साथीचे आजार उद्भवू नये, याकरीता पालिकेचा आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

अरुणकुमार मेहत्रे ,  कळंबोलीपनवेल शहरात डेंग्यू यासारख्या साथीचे आजार उद्भवू नये, याकरीता पालिकेचा आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये याकरीता ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक फवारणी तसेच जनजागृतीही करण्यात येत आहे. मोहिमेसाठी १० आरटी वर्कर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. रोग झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा तो होऊ नये याकरीता ही उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे पालिका आणि ग्रमीण रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. पावसाळयात साथीच्या आजारांची प्रमाण वाढते. विशेष करून डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांवर वाढ होते. यंदाही पनवेल शहरात तीन डेंग्यू सदृश्य रूग्ण आढळले आहे. हे प्रमाण इतर ठिकाणांच्या तुलनेत कमी असले तरी तीव्रता वाढू नये, याकरीता विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार, साथीचे आजार होवू नये, याकरीता पालिका प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. शहरांतील घराघरांत जाऊन आरटी वर्क र्स तपासणी करीत आहेत. याशिवाय घरातील फुलदाण्या, ड्रम, टाक्या, कुंडया, शो-पीस , प्लास्टिक, फ्रीजरची तपासणी करण्यात येत आहे. डेंग्यू, मलेरियाच्या डासांची व्युत्पत्ती याच ठिकाणी होत असून त्यामुळे रोगाची लागण होती, हे नागरिकांना पटवून देण्यात येत आले. त्याचबरोबर कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आर.टी वर्कर्सच्या माध्यमातून करण्यात येत आहे. डोअर टू डोअर तपासणीचा अहवाल पनवेल पालिकेला सादर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण दहा जणांना आरोग्य विभागाने नोटीसा धाडण्यात आल्या आहेत. प्रशिक्षित पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून औषध फवारणी करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. डेंग्यूकरीता पॅराथाम लिक्वीडची फवारणी करून अळया मारण्यात येत आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाकडे फवारणी मशिन्सची संख्याही वाढवली आहे. या व्यतिरिक्त पत्रक, बॅनर्स लावून पनवेलकरांमध्ये जागृती करण्यात आले. नगराध्यक्षा चारूशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे, आरोग्य सभापती मनोहर म्हात्रे, ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक बी.एस लोहारे, आरोग्य निरिक्षक दिलीप कदम,दौलत शिंदे, शैलेश गायकवाड, संगिता आंबोलकर याबाबत विशेष लक्ष ठेवून आहेत. रस्त्यालगत साचलेला पाला-पाचोळा, डेब्रिज, प्लास्टिकच्या पिशव्या उचलणे, नाले, गटारांची साफसफाई, झाडे झुडप, गवताची छाटणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे . मलेरिया आणि डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आपले घर, सोसायटी आणि परिसराची स्वच्छता कशी ठेवावी, याबाबत प्रबोधन करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागकडून सांगण्यात आले.