शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

एचडीएफसी सर्कल घेणार मोकळा श्वास

By admin | Updated: July 12, 2016 02:48 IST

नवीन पनवेल उड्डाणपुलाखाली शहरात प्रवेश करण्यापूर्वीच एचडीएफसी सर्कलमधील वाहतूककोंडी ही वाहनचालकांच्या स्वागतासाठी तयार असते

वैैभव गायकर,  पनवेलनवीन पनवेल उड्डाणपुलाखाली शहरात प्रवेश करण्यापूर्वीच एचडीएफसी सर्कलमधील वाहतूककोंडी ही वाहनचालकांच्या स्वागतासाठी तयार असते. चार ठिकाणांहून येणारऱ्या गाड्या एकाच ठिकाणी या सर्कलजवळ येत असल्याने ही वाहतूककोंडी वाढत जाते. त्यातच या ठिकाणी असलेल्या सर्कलचा आकार देखील मोठा असल्याने जागेअभावी या ठिकाणी वाहतूककोंडी वाढत जाते. यासंदर्भात पनवेल वाहतूक शाखेच्या वतीने सिडकोला पत्र लिहून या ठिकणच्या सर्कलचा आकार कमी करण्याची विनंती सिडकोला करण्यात आली होती. त्या मागणीला सिडकोकडून प्रतिसाद मिळत असून, लवकरच या ठिकाणी होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या वाहतूक पोलिसांची देखील ही वाहतूककोंडी सोडविताना नाकी नऊ येते. नवीन पनवेलमधील शाळा, महाविद्यालये, बँका, दवाखाने असल्याने या ठिकाणी विद्यार्थी, नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र पाच मिनिटांचे अंतर गाठण्यासाठी २० ते २५ मिनिटे या ठिकाणी खर्च करावी लागतात. अपुरी जागा, त्यातच दिवसेंदिवस वाढत्या गाड्यांच्या संख्येमुळे या ठिकाणी वाहतूककोंडी ही समस्या गंभीर बनत चालली आहे. यासंदर्भात मागील वर्षभरापासून पनवेल वाहतूक पोलीस सिडकोशी पत्रव्यवहार करीत आहेत. नव्याने सर्कल उभारून कमी जागेत त्याची उभारणी करावी अशी मागणी या पत्राद्वारे सिडकोकडे करण्यात आली होती. नवीन पनवेलमध्ये सीकेटी, पिल्लई, विसपुते, बांठिया आदींसह अनेक लहानमोठ्या शाळा-महाविद्यालये आहेत. दुपारी १२ च्या सुमारास शाळा-महाविद्यालये सुटण्याच्या वेळेला ही वाहतूककोंडी प्रचंड वाढते. शाळेच्या बस या ठिकाणाहून जात असताना ही वाहतूककोंडी आणखीनच वाढते. परीक्षांच्या वेळेला देखील हीच समस्या उद्भवते. काही परीक्षार्थींना तर वेळेवर परीक्षांना पोचता येत नाही.