शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत-नेरळमध्ये मध्यरात्री ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2015 22:55 IST

कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला.

कर्जत : कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे यंदा उपस्थिती लक्षणीय होती. मध्यरात्रीच्या झेंडा वंदनाचे हे अकरावे वर्ष आहे. कर्जतच्या भाऊसाहेब राऊत चौकात मध्यरात्री ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. चौकाच्या नामफलकाला जे. एम. मिर्झा यांनी पुष्पहार अर्पण केला. नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले आणि ठीक बारा वाजून दोन मिनिटांनी पत्रकार संघाच्या अध्यक्षा वैदेही पुरोहित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुनील दांडेकर, श्रीराम पुरोहित, कार्यवाह संजय गायकवाड आदी उपस्थित होते.सकाळी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्र मात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नगरसेवक संतोष पाटील, पंचायत समिती कार्यालयात सभापती सुवर्णा बांगारे, नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष राजेश लाड, तहसील कार्यालयात तहसीलदार रवींद्र बाविस्कर, उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी राजेंद्र बोरकर, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रमेश भोसले, कोकण ज्ञानपीठ कर्जत महाविद्यालयात प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मधुकर लोंगरे, फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मोहन काळे, इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अध्यक्ष झुलकरनैन डाभिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.मशालफेरीनंतर मध्यरात्री ध्वजारोहणनेरळ : नेरळ येथील हुतात्मा चौकामध्ये सलग अकराव्या वर्षी मध्यरात्री राष्ट्रीय झेंडा फडकविण्यात आला. शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरु ण यांनी मशाल फेरी काढून रात्रीच्या वेळी नेरळमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या हस्ते मध्यरात्री तिरंगा फडकविण्यात आला. त्यावेळी पाचशेहून अधिक तरु ण हुतात्मा चौकात उपस्थित होते. नेरळ येथील हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने गेली दहा वर्षे हुतात्मा चौकामध्ये राष्ट्रीय झेंडा १४ आॅगस्टच्या मध्यरात्री फडकविण्याचा कार्यक्र म आयोजित केला जातो. नेरळ -माथेरान रस्त्यावर असलेल्या हुतात्मा चौकामध्ये स्वातंत्र्यदिन कार्यक्र म साजरा होतो. रात्री अकरा वाजता मशालफेरी काढण्यात आली.