शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

सुधागडमध्ये पाच शाळा बंद

By admin | Updated: July 16, 2016 01:58 IST

‘गाव तेथे शाळा’ या धोरणानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा चालू झाल्या. परंतु गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातही इंग्रजीचे वारे वाहू लागल्याने

पाली : ‘गाव तेथे शाळा’ या धोरणानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा चालू झाल्या. परंतु गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातही इंग्रजीचे वारे वाहू लागल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या रोडावू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुधागड तालुक्यातील तोरणकेवाडी, पुई, बलाप, गोंडाळे आणि कोंडजाई येथील जि. प. च्या मराठी शाळा शासनाने बंद केल्या आहेत.गावातील काही कुटुंबांनी रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर केले असले तरी जी कुटुंबे गावात आहेत, त्यांच्या मुलांनी आता शिकायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुलांना शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुधागड तालुक्यात आता गावच्या ठिकाणी देखील इंग्रजी माध्यमातील शाळा झाल्यामुळे जि. प. च्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी झाले आहेत. मराठी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारायला हवा याबाबतीत सर्व स्तरातून नेहमीच आवाज उठत असतो. परंतु दर्जा सुधारताना मात्र दिसत नाही. याला शिक्षकांमधील अंतर्गत राजकारण व हेवेदावे कारणीभूत असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे. जि. प. च्या शाळांमध्ये सेमी इंग्लिश अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. जि. प. च्या बहुतांशी शाळा गळक्या, पडक्या तसेच वीजपुरवठा नसलेल्या अवस्थेत आहेत. शासनाच्या मानव विकास विभागातर्फे सुधागड तालुक्यात आजही कित्येक वाड्यांमध्ये एसटी पोहचत नाहीत. काही ठिकाणी सुरू असलेल्या फेऱ्याही महामंडळाने बंद केल्या आहेत. तसेच शाळांमध्ये जावून बस पासच्या सुविधेबाबतही अंमलबजावणी होताना दिसत नाही.