शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गांजा तस्करी प्रकरणी आणखी पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:45 IST

गांजा तस्करी प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आणखीन पाच जणांना अटक केली आहे. २६ जून रोजी पोलिसांनी या प्रकरणात सर्वप्रथम दोन जणांना अटक केली

अलिबाग : गांजा तस्करी प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आणखीन पाच जणांना अटक केली आहे. २६ जून रोजी पोलिसांनी या प्रकरणात सर्वप्रथम दोन जणांना अटक केली होती. त्यामुळे आता आरोपींची संख्या सात झाली आहे. पकडण्यात आलेल्या एका आरोपीकडून ५०० ग्रॅम गांजा सापडल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक शेख यांनी दिली.२६ जूनला अलिबागमधील मुख्य गांजा विक्रेता आशिष तळेकर (४७) याच्यासोबत रोहित घरत (३३) या दोघांना अटक केली होती. या दोघांची पोलिसांनी चौकशी केली असता जिल्ह्यातील मुख्य गांजा विक्रेता हा उरण येथील असल्याची माहिती आशिष तळेकर यांनी दिली. तर अलिबागमध्ये कॉलेज तरुण-तरुणींना गांजा विक्री करणाऱ्या अजून चार जणांची माहिती रोहित घरत याने पोलिसांना दिली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गांजाचा मुख्य तस्कर कमलाकर काशिनाथ गायकवाड ( ६१, रा. दादर पाडा, पो. दिघोडे, उरण), प्रणयजीत विष्णू पाटील ( ३२, रा. गोंधळपाडा), प्रताप पेरेकर ( २८), मितेश शुक्ला (२३), गजानन सोम्या नाईक ( ४७) अलिबाग या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यातील प्रणयजीत पाटील याला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता त्याच्याकडून ५०० ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे, तर अन्य जणांकडे काहीही मिळाले नाही. या पाचही जणांना अटक करण्यात येऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.जिल्ह्यातील मुख्य गांजा विक्रेता कमलाकर गायकवाड हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर ३ प्रकरणी खटला सुरू आहेत. कमलाकर हा नक्षलग्रस्त भागातून गांजा घेऊन येत होता, तर त्याचा मुलगा हा कर्नाटकमध्ये राहातो. तोसुद्धा गांजा विक्रेता म्हणून काम करीत आहे, अशी माहिती शेख यांनी दिली. या सर्व गांजा तस्करांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्यामुळे जिल्ह्यातील इतर गांजा विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.