शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

पाच ग्रामपंचायतींचे दप्तर कचऱ्यात

By admin | Updated: February 15, 2017 04:48 IST

तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची महत्त्वाची कागदपत्रे, ग्रामपंचायतीची कोरी लेटरपॅड्स, महत्त्वाचे ठराव आदिंसह कागदपत्रांचे

महाड : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची महत्त्वाची कागदपत्रे, ग्रामपंचायतीची कोरी लेटरपॅड्स, महत्त्वाचे ठराव आदिंसह कागदपत्रांचे दप्तर शहरानजीकच्या शिरगाव येथील रस्त्यालगत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी कचऱ्यात ही कागदपत्रे आढळून आली त्या ठिकाणाजवळच ग्रामसेवक वसाहत असून त्या वसाहतीत राहणाऱ्या एका ग्रामसेवकानेच ही महत्त्वाची कागदपत्रे रद्दी म्हणून कचऱ्यात टाकण्याचा प्रताप केल्याची चर्चा परिसरात होत आहे.सोमवारी सायंकाळी ५ वाजता शिरगाव येथे एका तंबाखूच्या गोदामाला आग लागली होती. त्यावेळी घटनास्थळी गेलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीचे दप्तर रस्त्याच्याच कडेला आढळून आले. या ढिगाऱ्यात नागाव, सव, राजिवली, राजेवाडी आदि ग्रामपंचायतींची कोरी लेटरहेड्स, सही शिक्का असलेली कोरी ओळखपत्रे, अ‍ॅसेसमेंट उतारे, शासनाच्या नवीन विविध योजनांची माहिती पुस्तके व पुस्तके, ग्रामपंचायतीच्या अनेक महत्त्वाच्या ठरावांच्या मूळ प्रती, नोंदणी पुस्तके, मोजणी पुस्तके आदि दस्तऐवज या कचऱ्यात दिसून आले. ग्रामसेवक वसाहतीत राहणाऱ्या ग्रामसेवकानेच ही कागदपत्रे रद्दी म्हणून कचऱ्यात टाकली असावीत, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून या कचऱ्यातील काही दस्तऐवजांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ग्रामपंचायतीची कागदपत्रे रेकॉर्ड म्हणून जतन करण्याऐवजी अशा प्रकारचे कचऱ्यात टाकण्याचे प्रताप करणाऱ्या बेजबाबदार ग्रामसेवकांवर पंचायत समितीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.