शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

जिल्ह्यात पाच दिवस माघी गणेशोत्सवाची धूम

By admin | Updated: February 10, 2016 03:05 IST

माघ महिन्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. गुरुवारी श्री गणेश जयंतीनिमित्त पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमधून तब्बल १०० मोठ्या गणेशमूर्ती रवाना देखील झाल्या आहेत. सार्वजनिक माघी

पेण : माघ महिन्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. गुरुवारी श्री गणेश जयंतीनिमित्त पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमधून तब्बल १०० मोठ्या गणेशमूर्ती रवाना देखील झाल्या आहेत. सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाचा पाच दिवसांचा उत्सवाचा थाटमाट १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. याशिवाय गावोगावी व अष्टविनायकांच्या स्थानी माघी गणेश जयंतीनिमित्ताने गणेशभक्तांसाठी बाप्पाच्या मंगलमय दर्शनाची सुवर्णसंधी लाभणार असून विविध धार्मिक व रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल यानिमित्ताने ठेवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस बाप्पांच्या उत्सवाचा माहोल नंतर शिवजयंतीचा माहोल यामुळे माघातला पुढचा आठवडा रसिकजनांसाठी आनंदाची पर्वणी घेवून येणार आहे.गणेशोत्सवाची हौसमौज न्यारीच असते. यामध्ये युवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची हौस भारीच असते. भाद्रपदातील गणेशोत्सव, साखरचौथ गणेशोत्सव, नंतर माघातला गणेशोत्सव यांचा थाटमाट सारखाच असतो. अलीकडे माघी सार्वजनिक गणेशोत्सव पेण, उरण, अलिबाग, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई उपनगरे आदी ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. पेण व हमरापूर जोहे पट्ट्यातील निवडक अशा प्रसिद्ध कार्यशाळांमधून १०० मोठ्या मूर्ती माघातल्या गणेशोत्सवासाठी आकर्षक रंगसंगतीने नटूनथटून रवानादेखील झाल्यात. पेणच्या दीपक कला केंद्रातून तब्बल ३० गणेशमूर्ती पुणे, मुंबई या मोठ्या शहरामध्ये माघी गणेशोत्सवासाठी रवाना झाल्याचे मूर्तिकार सचिन व नीलेश समेळ या बंधूंनी सांगितले. स्थानिक परिसरातील हमरापूर जोहे पट्ट्यातील कार्यशाळांमधून उर्वरित गणेशमूर्ती नेण्यात आल्या. (वार्ताहर)