शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या जहाजांमुळे मासेमारीला बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:18 IST

दिघी बंदरामुळे अडचण; पारंपरिक मासेमारी धोक्यात

दिघी : एकीकडे पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ‘सागरमाला’ प्रकल्पातून सरकारने परिणामकारक पावले उचलली आहेत. यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील दिघी येथील रोजगार मिळवून देणारी पारंपरिक मासेमारी समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे. श्रीवर्धन तालुक्यालगत राजपुरी खाडीवर उभे राहत असलेले दिघी बंदर हे पारंपरिक मासेमारीला घातक ठरणार या काळजीने दिघी, आगरदांडा व राजपुरी परिसरातील मच्छीमार चिंताग्रस्त आहेत.दिघी या पारंपरिक बंदर खासगीकरणातून विकास या संकल्पनेतून अत्याधुनिक बंदर उभारण्याचा प्रकल्प बालाजी लिझिंग अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेड ही कंपनी विकसित करत आहे. दिघी बंदर अद्याप ५० टक्केही विकसित झाले नाही. सध्या सुरू असलेला महाकाय जहाजांचा प्रवास यामुळे कालांतराने सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर बंदी घातली जाणार आहे. ही भीती भूमिपुत्रांच्या मनात घर करून आहे. अतिशय कमी भावात दिघी पोर्टसाठी आपल्या जमिनी देताना असा विचारही जमीनदारांच्या मनात आला नव्हता. या प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी त्यांना विविध आश्वासने देण्यात आली होती. त्यात गावातील सुविधा स्थानिकांना रोजगार यासह स्थानिकांना ठेके देऊन येथील तरुणांना स्वयंपूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले होते. या गोष्टींची पूर्तता अद्याप झालेली नाही. कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक तरु णांची फसवणूक केली आहे, त्यामुळे कंपनीच्या विरोधात नाराजी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावातील अनेक स्थानिक या समुद्रामध्ये पारंपरिक पद्धतीने किंवा छोट्या होडीने मच्छीमारी करून उपजीविका करतात. दरम्यान, वातावरणातील बदल, अवेळी वादळाची हजेरी, मासेमारी दुष्काळ होत असताना कंपनीच्या धोरणामुळे पारंपरिक मासेमारी करणाºयांवर उपासमारीची वेळ येणार आहे.दिघी बंदरात गेल्या पाच-सहा वर्षांपासून मोठी जहाजे येत आहेत. ही जहाजे येत असताना दिघी गावातील मच्छीमार बांधवांनी मच्छीसाठी टाकलेली जाळी व डोलवी तुटली जातात, त्यामुळे जाळ्याचे व मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पूर्वी दिघी पोर्ट प्रत्येक जहाजामागे नुकसानभरपाई देत होते. मात्र, सध्या अशी कोणतीही नुकसानभरपाई देत नाही. दिघी बंदरामुळे दिघी गावातील मच्छीमारी करणारी ६० कुटुंबे बाधित झाली आहेत.दिघी बंदरात महाकाय जहाजांच्या होणाºया वाहतुकीमुळे आम्हा मच्छीमारांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, कुणीही मदतीला येत नाही. वेळोवेळी होणाºया नुकसानभरपाईसाठी कंपनीकडून विचारलेसुद्धा जात नाही.- बाळाराम खेलोजी,दिघी कोळी समाज अध्यक्ष

टॅग्स :fishermanमच्छीमार