शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमार आर्थिक संकटात

By admin | Updated: November 19, 2015 00:26 IST

परराज्यातील मासेमारी करणारे तर दुसरीकडे वेळेत डिझेल परतावा मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील परंपरागत मच्छीमार व्यावसायिक आर्थिक संकटात बुडाले आहेत.

- आविष्कार देसाई,  अलिबागपरराज्यातील मासेमारी करणारे तर दुसरीकडे वेळेत डिझेल परतावा मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील परंपरागत मच्छीमार व्यावसायिक आर्थिक संकटात बुडाले आहेत. पर्साेनेटच्या माध्यमातून होणारी मासेमारी त्वरित थांबवावी आणि सुमारे ५० लाख रुपयांचा डिझेलचा परतावा तातडीने द्यावा, अशी मागणी अलिबाग येथील मच्छीमार व्यावसायिकांची आहे.अलिबागसह मुरुड, उरण, श्रीवर्धन येथील मच्छीमार व्यावसायिकांचीही अशीच बिकट अवस्था असल्याने सर्व मच्छीमार आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगड जिल्हा हा पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा तसाच मासेमारीसाठी प्रसिध्द होता. कालांतराने जिल्ह्यात औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. जिल्ह्यात झपाट्याने मोठ्या संख्येने कारखाने निर्माण झाले. उद्योगांसाठी जमिनी जात असतानाच विविध कारखान्यांमुळे नद्या आणि समुद्राचे पाणी प्रदूषणाची फार मोठी समस्या निर्माण झाली. त्यामुळे मच्छीमारी करणाऱ्यांना मासे कमी प्रमाणात मिळू लागले. रायगड जिल्ह्यामध्ये उरण, रेवस, करंजा, मांडवा, नवगाव, थळ, वरसोली, अलिबाग, नागाव, साखर, रेवदंडा, मुरुड, श्रीवर्धन या चॅनेलमध्ये स्थानिक मच्छीमारी व्यावसायिक मासेमारी करीत आहेत. याच चॅनेलमध्ये आता कर्नाटक आणि गुजरात राज्यातील तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्यांनी हातपाय पसरले आहेत. त्यांच्याकडे आधुनिक बोटी असून बहुतांश मासेमारी व्यावसायिक हे पर्साेनेट जाळ््याने मासेमारी करतात. त्यामुळे कमी वेळेत मोठ्या संख्येने मासेमारी करुन कोट्यवधी रुपये कमवित आहेत.स्थानिक मच्छीमारी करणाऱ्यांकडे मोठ्या संख्येने आधुनिक बोटी नाहीत. ते परंपरागत म्हणजे डोल, गळ, दालदी, मगरमच्छ पध्दतीने मासेमारी करतात. परंपरागत पध्दतीने मासेमारी करणाऱ्यांच्या चॅनेलमध्ये परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील मासेमारी करणारे येत असल्याने परंपरागत मासेमारी करणारे संकटात सापडले असल्याचे अलिबाग शहर कोळी समाजाचे अध्यक्ष प्रकाश भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्राप्तीनुसार संस्थांना मिळणार रक्कमसहायक आयुक्त अविनाश नाखवा हे कामानिमित्त बाहेर होते. त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, डिझेल परताव्याची रक्कम सरकारकडून प्राप्त होते तशी संस्थांना दिली जाते, असे सांगितले.