शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये भरली कोकणातील पहिली जल नियोजन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:14 IST

संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट घोंगावत असताना भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकणालाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत

महाड : संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट घोंगावत असताना भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकणालाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत, यासाठी जलनियोजन आणि जलसाक्षरता महत्त्वपूर्ण असल्याने, कोकणातील पहिल्या जलनियोजन अंदाजपत्रक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन बुधवारपासून हिरवळ संस्थेच्या वतीने महाड शहरातील मिलिटरी बोर्डिंगच्या कॅम्पसमध्ये केले आहे.कोकणात पाऊस चांगला पडत असतानाही पाण्याच्या नियोजनाअभावी दरवर्षी कोकणातील अनेक तालुक्यांत उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसतात, यासाठी ठिकठिकाणी जलदूतांमार्फत जनजागृती पाणी नियोजनात सुसूत्रता होऊन आपला जलनियोजनाचा हेतू सफल होईल, असा विश्वास हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. भविष्यात जलनियोजन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन धारिया यांनी या वेळी केले.चार दिवस चालणाºया या कार्यशाळेमध्ये यशदा, पुणे, अ‍ॅक्शन आॅन क्लायमेट टुडे., आॅटर या संस्थांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह पालघर, मोखाडा भागातील जलदूत या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. कोकणातील जमीन, उतार, मातीचा पोत, भौगोलिक परिस्थिती सर्व काही वेगळे आहे, त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राचे निकष लावून कोकणात पाणी नियोजनाबाबत कार्यक्रम राबवले जाऊ नयेत, अशी गरज या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली.हिरवळ प्रतिष्ठान या संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी विष्णू साळवे, यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंंत पांडे, लघू पाटबंधारे विभागाचे एस. एम. गोडसे, संजय परांजपे, महाड पंचायत समिती सभापती सपना मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.