शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये खत-बियाण्याच्या दुकानाला आग, ३६ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:14 IST

पेण एसटी स्थानकाजवळील अंतोरा रस्त्यावर असलेल्या खत बियाणे एजन्सीच्या दुकानाला शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास आग लागली.

पेण : पेण एसटी स्थानकाजवळील अंतोरा रस्त्यावर असलेल्या खत बियाणे एजन्सीच्या दुकानाला शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास आग लागली. यात खते, बियाणे व कीटकनाशके अशी सामग्री खाक झाली. आगीमुळे अंदाजे ३६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.शॉटसर्किटमुळे दुकानाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून अधिक पेण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस यंत्रणेला आगीबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पेण नगरपरिषद तसेच जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशामक दलाना पाचारण केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जवळपास ३६ लाखांची वित्तहानी झाली आहे.पेणमधील बसस्थानकाजवळ असलेल्या समर्थ खत आणि बियाणे विक्री केंद्र आहे. या ठिकाणी दोन गाळ्यात खत, बियाणे व कीटकनाशकाचे दुकान व गोदाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. चाळीवजा या इमारतीत काही कुटुंबेही वास्तव्यास आहेत. जि. प. सदस्य प्रभाकार म्हात्रे यांच्या कुटुंबीयाच्या मालकीचे हे दुकान असून त्यांचे बंधू दिनेश म्हात्रे हे या दुकानाचे कामकाज पाहतात. नेहमीप्रमाणे रात्री ८.०० च्या सुमारास दुकान बंद करून वडखळ येथे घरी गेल्यानंतर रात्री ही घटना घडली. या आगीच्या घटनेत दुकानातील इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर इतर साधनसामग्री यांच्यासह खरीप खरेदी करून भरलेला हंगामासाठी लाखो रुपये किमतीच्या बियाण्यांचा साठा खाक झाला. नुकसान पंचनाम्याचे काम पेण तलाठी शिवाजी ताबले यांनी केले.