शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तळोजात रासायनिक कंपनीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:34 IST

अनर्थ टळला : कंपनी प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कॉन्गिझंट या रासायनिक कंपनीला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याने एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली. रसायनांच्या गळतीमुळे ही आग लागली असून त्यात संपूर्ण कंपनी खाक झाली. कंपनीच्या आवारातील झाडेदेखील जळाली आहेत.

तळोजा एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक डब्ल्यू २१६ या जागेवर कॉन्गिझंट हा कारखाना आहे. या ठिकाणी असलेल्या ज्वलनशील रसायनामुळे संपूर्ण कंपनी भस्मसात झाली. मध्यरात्री घटना घडल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास उशीर झाला. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नसली तरी कंपनी प्रशासनाची हलगर्जी या घटनेला कारणीभूत आहे. आगीची तीव्रता जास्त असल्याने आजूबाजूच्या दोन कंपन्यांनाही झळ बसली आहे. कॉन्गिझंट कंपनीच्या आवारात उभी असलेली दुचाकी भक्षस्थानी पडली असून झाडेदेखील पूर्णपणे जळाली आहेत. घटनेनंतर गळती झालेले रसायन कंपनीलगतच्या नाल्यातून वाहून गेल्याने ही आग २०० ते ३०० मीटरपर्यंत पसरली. अग्निशमन यंत्रणेने दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. तळोजा एमआयडीसीमध्ये एकूण ३५० रासायनिक कारखाने आहेत. कंपन्यांच्या हलगर्जीमुळे वारंवार अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांत येथील तीन कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. कंपनीतील सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कॉन्गिझंट कंपनी प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.संबंधित रसायन ज्वालाग्राही असल्याने आगीने त्वरित पेट घेतला. या घटनेत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. आमचे पथक या संदर्भात चौकशी करीत आहे. कॉन्गिझंट कंपनीवर फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल .- एम. आर. पाटील,संचालक, औद्योगिक सुरक्षा विभागगुन्हा दाखल करासंबंधित कंपनीत केमिस्ट्री इंजिनीअर कार्यरत होता का, याची चौकशी करण्याची गरज आहे. केवळ कंपन्यांचा उदासीन कारभारच याला जबाबदार आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली आहे.

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल