शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

जिल्ह्यात आदिशक्ती दुर्गामाता मुर्तीवर अखेरचा हात

By निखिल म्हात्रे | Updated: September 20, 2022 16:07 IST

आता सर्वांनाच वेध लागलेत आठवडाभरांनी साजर्‍या होणार्‍या शारदीय नवरात्रोत्सवाचे.

अलिबाग - गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर पितृपक्ष पंधरवडाही निम्मा सरल्याने जिल्ह्यातील मुर्तीशाळांमध्ये आता नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरु असल्याचे चित्र दिसत आहेत. दोन वर्षे कोरोनामुळे सारे सण,उत्सव साधेपणाने साजरे करावे लागले होते. पण यावर्षी संकट टळल्याने सरकारने सर्व सण निर्बंधमुक्त केले. त्याचे प्रत्यंतर नुकत्याच साजर्‍या झालेल्या गणेशोत्सवात दिसून आले. आता सर्वांनाच वेध लागलेत आठवडाभरांनी साजर्‍या होणार्‍या शारदीय नवरात्रोत्सवाचे.

यंदाच्या नवरात्रोत्सवात देवींच्या मुर्तींमध्ये नाविण्य आणण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अनेक मूर्तीशाळांना भेट देऊन आपल्या आवडीच्या देवीच्या मूर्ती पसंत करु लागले आहेत. त्यामुळे येथील मूर्तीकार दुर्गा मातेच्या मूर्ती आकर्षक तयार होण्यासाठी काढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यातच गेल्या आठ ते दहा दिवसापासून जिल्हयात पावसाने थैमान घातले आहे. पेण तालुक्यात झालेली ढगफुटी यासर्व बाबींचा विचार करता मुर्तीकारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. असे असताना देखील मुर्तीकार पूर्ण ताकदनिशी आपल्या मूर्तीशाळामध्ये दुर्गा मातेच्या मूर्ती तयार करण्यात व्यस्थ पहायला मिळतात. 

काही ठिकाणी लाकडाच्या शेगडयांच्या सहाय्याने मूर्ती सुकविल्या जात आहेत. तर काही ठिकाणी मुर्तींना पॉलिश करणे सुरू आहे, दुसरीकडे रंग काम, तर काही ठिकाणी रंगापेक्षा नव नविन वस्त्र लावण्यात कारागीर व कारखानदार व्यस्थ पहायला मिळतात.

पितृपक्ष संपताच सोमवार पासून नवरात्र उत्सवाला सुरूवात होत असून मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सोबत महिलावर्ग देखील नवरात्री उत्सवाच्या तयारीसाठी लागलेले पहायला मिळतात. एकंदरीत मुर्तीकारांसह मंडळाचे सभासद, महिला वर्ग, दुर्गा मातेच्या आगमनासाठी जय्यत तयारीला लागले आहेत.

मुर्तींच्या उंचीमध्ये मंडळाच्या सभासदांनी केलेल्या वाढीमुळे अनंत चतुर्थीनंतर नव्याने मूर्ती तयार कराव्या लागल्या आहेत. त्या लाकडांच्या सहाय्याने सुकवाव्या लागत आहेत. त्यातच मंडळाच्या सभासदांकडून रंगापेक्षा खर्‍याखुर्‍या कपडे परिधान करून मूर्ती सजवून मागितल्या जात आहेत. - महेश घरत, मुर्तीकार.