शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यांसाठी ड्रोन कॅमेऱ्यांनी चित्रीकरण

By admin | Updated: June 13, 2017 02:59 IST

तालुक्यातील रेल्वेपट्टा हिरवागार करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाली-भूतीवली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

कर्जत : तालुक्यातील रेल्वेपट्टा हिरवागार करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाली-भूतीवली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. मात्र कालवे नसल्याने धरणाचे पाणी मागील एक दशक तसेच पडून आहे. धरणाचे पाणी शेतीसाठी देण्याकरिता आवश्यक असलेले कालवे बनविण्यासाठी पाटबंधारे विभागाने कालव्यांच्या सीमा निश्चित करण्याचे काम हाती घेतले आहे. कालव्यांचे सीमांकन करण्यासाठी कर्जत पाटबंधारे विभागाने त्या कामासाठी ड्रोन कॅमेरे वापरले.कर्जत तालुक्यातील सावरगावपासून आंबिवली या रेल्वेपट्ट्यातील गावातील जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी पाली-भूतीवली लघु पाटबंधारे प्रकल्पाची निर्मिती केली आहे. ५० कोटीहून अधिक खर्च करण्यात आलेल्या या धरणाचे पाणी परिसरातील २० गावांमधील १००० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यासाठी मुख्य कालवा तसेच उजवा आणि डावा असे १५ किलोमीटरचे कालवे निर्माण केले जाणार होते. पाटबंधारे खात्याच्या तत्कालीन अधिकारी वर्गाने केलेल्या चुकीच्या नियोजनामुळे धरणाच्या जलाशयात पाणीसाठा होत असताना आवश्यक कालवे तयार करून घेतले नाहीत. त्यामुळे धरणाचे पाणी २००३पासून जलाशयात पडून आहेत. दुसरीकडे कालव्याचे सीमांकन त्यावेळी पाटबंधारे खात्याने केले नसल्याने शेतकऱ्यांनी कालव्यांच्या मार्गात अन्य कामे करून कालवे रोखून धरले. त्याचवेळी कालव्यांसाठी लागणारी जमीन मिळावी म्हणून त्याचे अधिग्रहण देखील करण्यात आले नसल्याने शेतकरी विना मोबदला जमीन देण्यास विरोध करीत आहेत. त्याचा परिणाम कालवे निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकले नाहीत आणि धरणाचे पाणी १००० हेक्टर जमिनीपर्यंत शेतीसाठी पोहचू शकले नाही.जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने कालवे जाणाऱ्या मार्गातील जमिनी अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळणार म्हणून विकल्या आहेत.त्यामुळे कालव्यांच्या मार्गात मागील काळात अडथळे निर्माण झाले आहेत. परंतु कोट्यवधी रु पये खर्चून पाणी असेच पडून ठेवले जाणार नाही अशी भूमिका स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी घेतली आहे.त्यामुळे पाटबंधारे विभागाने कालव्यांची कामे करण्याचे मनावर घेतले आहे. एकूण १५ किलोमीटर कालव्यांपैकी जेमतेम ५ किलोमीटरचे कालवे पाटबंधारे खात्याने खोदून घेतले आहेत. मात्र ते कालवे देखील अखंड नसल्याने धरणातील पाणी कालव्यात सोडता आले नाही. कालवे करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी पाटबंधारे विभाग सरसावला आहे. त्यांनी कालव्याचे सीमांकन करण्यासाठी ड्रोन कॅमेरे आणून त्यांच्या माध्यमातून सर्व भागातील कालव्याच्या सीमा निश्चित केल्या आहेत. आता पावसाळ्यानंतर कालव्यांच्या कामाला सुरु वात होण्याची शक्यता असून दरम्यानच्या चार महिन्यात पाटबंधारे विभाग जमीन अधिग्रहण करण्यासाठी कार्यवाही करणार आहे.आमच्या भागातील शेतकरी २००३ पासून पाली-भूतीवली धरणात असलेले पाणी पाहत आहे. शेतीसाठी कधी पाणी येईल याची वाट शेतकरी अनेक वर्षे पाहत होता. त्यामुळे शेतात पाणी आणण्यासाठी आवश्यक असलेले कालवे तयार करण्यासाठी प्राथमिक पाऊल पाटबंधारे विभागाने उचलले असल्याने येथील शेतकरी आनंदी आहे. - किशोर गायकवाड, स्थानिक शेतकरी