शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

कर्जत तालुक्यातून १२४ नामनिर्देशनपत्रे दाखल

By admin | Updated: February 7, 2017 04:16 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आजपर्यंत कर्जत तालुक्यातील १८ जागांसाठी एकूण १२४ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या आघाडीने तसेच भारतीय जनता पार्टी आरपीआय युतीच्या, शिवसेना, काँग्रेस, मनसे, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे कर्जत तालुक्यात प्रथमच आॅल इंडिया मजलिसे इ इत्तेहादुल मुस्लिमीन (ए आय एम ई एल एम) पार्टीने शेलू गणातून पंचायत समितीसाठी आपल्या उमेदवाराचा अर्ज भरला आहे. कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद प्रभागाचे सहा गट आहेत तर पंचायत समिती प्रभागाचे बारा गण आहे. २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र भरावयाचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद गटासाठी २१ तर पंचायत समिती गणासाठी ३६ असे ५७ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. १ ते ६ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद (गट) साठी ४० तर पंचायत समिती (गण) साठी ८४ अशी एकूण १२४ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भडकवाड यांनी दिली.सोमवारी रायगड जिल्हा परिषद विद्यमान अध्यक्ष सुरेश टोकरे, सदस्य सुदाम पेमारे, माजी समाजकल्याण सभापती नारायण डामसे, तर पंचायत समितीचे माजी सभापती धोंडू राणे, माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (वार्ताहर)भाजपा प्रथमच निवडणूक रिंगणातमाणगाव: तालुक्यात प्रथमच भाजपा पक्षाने तीन गटात व सहा गणात आपले उमेदवारी अर्ज ६ फेब्रुवारी रोजी दाखल केले आहेत. मात्र मोर्बा गट रिक्त ठेवला आहे. जिल्हा परिषद गोरेगाव गटासाठी एस.सी. महिला आरक्षण म्हणून भारती भालचंद्र महाले तर गोरेगाव गणासठी युवराज हरिभाऊ मुंढे व लोणेरे गणासाठी दीपक मेस्त्री यांनी अर्ज दाखल केले असून तळाशेत जिल्हा परिषद गटासाठी ओबीसी महिला हर्षदा खेकडे तर तळाशेत गणासाठी अनुसूचित जमाती महिला देवका मोरे व साई गणासठी गणेश भोनकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निजामपूर जिल्हा परिषद गटासाठी एस.टी.महिला हीरा वाघमारे तर निजामपूर गणासाठी उषा महेश कासार व पाटणूस गणात अर्चना कोदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. मोर्बा जिल्हा परिषद गट व गण रिक्त ठेवला आहे.